Home Breaking News लाखो रुपये खर्च करुन तयार केलेला रस्ता ८ दिवसात उखडला

लाखो रुपये खर्च करुन तयार केलेला रस्ता ८ दिवसात उखडला

शैख चाँद प्रतिनिधी भूमीराजा

वाडेगाव,:- प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत वाडेगाव ते तामसी हा ७.८०कि.मी.चा रस्ता लाखो रुपये खर्च करून नुकताच तयार करण्यात आला मात्र सदर रस्त्याचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने हा रस्ता ८ दिवसातच जागोजागी उखडला असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे थातुर मातुर रस्ते तयार करून जनतेच्या पैशाची लुट केली जात असल्याचा आरोप तामशी येथिल नागरिकांनी केला आहे.वाडेगाव तामशी रस्ता

शासनाच्या वतीने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नवीन रस्ते आणि रस्त्याचे नुतनीकरण करण्याचे काम सुरू आहे. परंतु, हे रस्ते कंत्राटदाराच्या फायद्यासाठी केले जात आहेत का? असा प्रश्न नागरीक उपस्थित करीत आहेत. त्याला कारणही तसेच आहे. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथुन तामशी गावाला जोडणारा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा तयार केल्याची बाब समोर आली आहे. कारण या रस्त्यावरील मान्सुनपुर्व पावसामुळे जागोजागी डांबर उखडले असुन ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाडेगाव ते तामसी ७.८० की.मी च्या रस्त्यासाठी ५२८.८७ लक्ष रुपये मजुर करण्यात आले होते. त्यामुळे हा रस्ता दर्जेदार होणे अपेक्षित होते. मात्र सदर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने हा रस्ता अवघ्या ८ दिवसांतच उखडला असल्याने केवळ कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणेच्या फायद्यासाठी निष्कृष्ट दर्जाचे कामे केली जात आहेत का ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याची तात्काळ पाहणी करून हा रस्ता दर्जेदार करून देण्यात यावा तसेच या रस्त्याचे थातूर मातूर काम करुन जनतेच्या पैशाची लूट करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा संबंधित विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार

असल्याचा इशारा. तामसीचे सरपंच आनंदा पातोडे, उपसरपंच भगवान पातोंड, ग्रामपंचायत सदस्य सौ.पद्मा पातोडे. सुनिल मोरे. सौ विद्या पातोडे, सौ.सुलभा बोरसे, शुभम काळे, सौ.प्रतिभा काळे, यांच्यासह गावातील नागरिकांनी दिला आहे.

Previous articleजमिनीच्या वादाला कंटाळून यांची विष घेऊन आत्महत्या
Next article*संवाद हा नात्यांचा श्वास*