भूमीराजा प्रतिनिधी/ संतोष मोरे
बाळापूर:- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम कवठा येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती ची प्रतिस्थापना करण्यात आली. धार्मिक व उत्साही वातावरणात पार या सोहळ्यानिमित्त गावात सकाळ पासून च धम्ममय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध हयांचे भव्य प्रतिमेची धम्म रॅली गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली.
त्या मध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला रॅली दरम्यान बुद्ध वंदना घोषणाबाजी नी परिसर दुमदुमूला.बुद्ध विहारात पुज्य भदंत महाथेरो धम्मसेवकजी मुळावा, भदंत विनयपालजी शेगांव ह्यांच्या उपस्थितीत व हस्ते विधिवत बौद्ध पूजापाठ घेऊन तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मुर्ती ची प्रतिष्ठापना करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने बौद्ध वंदनेच्या भावमय वातावरणात हा सोहळा पार पडला. ह्यावेळी उपस्थित बौद्ध उपासक उपासिका व जनसमुदाय हयांना भदंत हयांनी मार्गदर्शन करताना तथागत भगवान बुद्धांचे शिकवणुकीचा व धम्माचा प्रेरणा दायी ईतिहास व त्याचे महत्त्व अधोरेखित केले.
त्यांनी आज घडीला समाजात शांतता समता आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी बुद्धाचा धम्म अवलंब करण्याचे आवाहन केले.प्रसंगी भगवान गौतम बुद्ध ह्याची सुंदर मूर्ती दान देणारे दानदाते गजानन महादेव घ्यारे हे आवर्जून उपस्थित होते त्यांचे उपस्थित व परिसरात लोकांनी विशेष कौतुक केले.मुर्तिसथापने नंतर विहार परिसरात पंचशील त्रिशरणासह बुद्ध वंदना व घेण्यात आली. कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी विविध विंग चे कार्यकर्ते भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष व महासचिव तसेच तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजु मोरे यांनी केले.




