हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070
प्रतिनिधी(नाशिक )सालाबादप्रमाणे याही वर्षी करंजी ग्रामस्थ तसेच हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती नाशिकयांच्या संयुक्त विद्यमानाने द्वितीय तुकोजीराव होळकर यांचा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून द्वितीय तुकोजीराव होळकर यांची वंशज श्रीमंत अभिमन्यू राजे होळकर उपस्थित होते. त्याचप्रमाणे मुकुंद राजे होळकर पंच भैय्या कमिटी इंदोर, आमय फडणीस, नवनाथ ढगे साहेब, समाधान बागल, डॉ.तुषार चिचोले,जलाल महाराज प्र, बिरार सर, प्रा. पाटील सर,बाळा पाडवी,यांसह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित होते.
करंजी गावाचे वेशीवर तांबडे कुटुंबियांनी राजाचे,औक्षण करत होळकर वंशजांच्या ताफ्यास श्रिफळ वाढवून जल्लोष स्वागत झाले.
मल्हार तुकेश्वर महादेव मंदिरात अभिमन्यू राजे होळकर यांच्यायांच्या हातून अभिषेक करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी होळकर शाही अभ्यासक व्याख्याते रामदास काळे यांनी तुकोजीराव होळकर द्वितीय यांच्या जीवनातील अनेक पैलुंवर प्रकाश टाकला व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले
या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न करुन आपल्या परंपरा सुरु करण्यासाठी जपण्यासाठी सार्वजनिक प्रयत्न करत असल्याचे सांगितले गावाच्या विकासासाठी प्रयत्न असुन तुकोजीराव होळकर यांचे स्मारकाची व यात्रेनिमित्त गरज पडणार्या काही मुलभुत सोइ आवश्यक असल्याने त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी वंशजांना साकडे घातले.
करंजी येथे जन्म घेऊन इंदोरच्या होळकरी गादीवर राज्य करणारे श्रिमंत द्वितीय तुकोजीराव होळकर महाराज यांचा 191 वा जन्मोत्सव सोहळा आनंदात पार पडला आधुनिक इंदोर नगरीची पायाभरणी करनारे राजे म्हणून तुकोजीराव होळकर महाराज यांच्या कडे पाहीले जाते त्यांच्या काळात इंदोरहुन रेल्वे ची सुरवात झाली शहराला पाणीपुरवठा स्वच्छता व रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देऊन इंदोर नगरी व होळकर राज्याच्या प्रजेसाठी सार्वजनिक काम करण्यासाठी तुकोजीराव होळकर यांचे नाव अजरामर आहे
निफाड तालुक्यातील करंजी सह अनेक गावे होळकर राज्याच्या अंतर्गत होती आणि म्हणूनच गावांमध्ये ऐतिहासिक वास्तू बघावयास मिळतात करंजी गावात तुकोजीराव होळकर यांचे स्मरणार्थ मल्हार तुकेश्वर महादेव मंदिर उभारले गेले आहे तसेच होळकर राजघराण्यातील व्यक्तींनी गोदावरी नदीच्या काठावर सुंदर घाठ वसवलेला आहे अहिल्यादेवी होळकर यांनी बाधलेली धर्म शाळा आजही स्थितीत असुन मंदिर व धर्म शाळेवरील नक्शी अप्रतिम आहे
प्रसंगी सरपंच चित्रा तांबेकर उपसरपंच सविता आडसरे
सभापती सुरेश आडसरे उपसभापती राजेंद्र निंबाळकर सोसायटी बंडु आडसरे, शरद जोशी, काळु बोराडे, योगेश आडसरे, प्रकाश आडसरे, भास्कर तांबडे आदीं सह महाशिवरात्र यात्रा कमिटी तरुण वर्ग गावकरी हजर होते.




