Home Breaking News नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे माजी...

नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष..

कोंडाजीमामा आव्हाड यांची महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर – 8983319070

महाराष्ट्रातील खाजगी शाळा संस्थाची शिखर असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व नाशिक च्या क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे माज़ी अध्यक्ष माननीय कोंडाजी मामा आव्हाड यांची निवड महामंडळाचे अध्यक्ष व माज़ी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे.
कोंडाजीमामा आव्हाड यांनी कार्यवाह या पदावर याआधी उत्कृष्ठ काम केले आहे. दोन वर्षापूर्वी नाशिक मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष मा. शरद पवार यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या शिक्षण संस्था महामंड ळाच्या राज्य अधिवेशनाच्या आयोजनाची मोठी जबाबदारी पार पाडण्यात महत्वाची भुमिका निभावली होती.
कोंडाजीमामा आव्हाड यांना उपाध्यक्ष या पदावर नेमणुक करुन महामंडळाने त्याच्या केलेल्या कार्याची पोचपावती दिली आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या समस्या सोडवीण्या करीता त्यांची महत्वाची भूमिका ते पार पाडतील अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील लोकांकडून व्यक्त होत आहे.
त्याच्या या निवड़ी करीता शैक्ष णीक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरां कडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Previous articleTISS SVE कडून विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याबद्दल तक्रार .
Next article।। दारिद्रयातील मैना ।।