Home Breaking News TISS SVE कडून विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याबद्दल तक्रार .

TISS SVE कडून विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याबद्दल तक्रार .

मुंबई :-टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथे स्कुल ऑफ व्होकेशनल एज्यूकेशन विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2022- 23 प्रवेशित असून आम्ही त्याकरिता साठ हजार अधिक ,अनामत रक्कम पाच हजार रुपये (जे घेणे शासन निर्णय च्या विरोधात आहे ),अधिक परीक्षा फीस 5000 रुपये अशे एकूण 70 हजार रुपये फी च्या स्वरूपात घेतात .सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयात प्रवेश घेण्यासाठी करण्यात आलेल्या जाहिरात व समक्ष समुपदेशन केल्यानंतर तसेच माहिती पुस्तिका मध्ये दिलेल्या सविस्तर माहिती नंतर जेव्हा विद्यार्थी प्रवेशित झाले तेव्हा प्रत्यक्षात मात्र तसे काहीच नव्हते थेरी आणि प्रॅक्टिकल चे एकूण 30 क्रेडिटचे 720 तास होणे अपेक्षित होते परंतु एकूण सहा महिन्यात केवळ 122 तासांची शिकवणे किंवा प्रॅक्टिकल झालेले आहेत आणि आता अभ्यासक्रम पूर्ण न करताच परीक्षेत चे वेळापत्रक दिले असून ते विद्यार्थ्यांना जबरदस्तीने थोपविल जात आहे केवळ 20% पेक्षाही कमी अभ्यासक्रम पूर्ण करून आमच्यावर परीक्षेत बसवण्याची सक्ती केली जात आहे .

“आम्ही व्हावे या उद्देशाने हा कोर्स करिकुलम बघून आणि तुमच्या समुपदेशनाला भूलून प्रवेश घेतला परंतु आमच्या पदरी निराशा आली आज आमचे भरलेले पैसे वाया गेलेले आहेत त्याचबरोबर अमूल्य वेळ सुद्धा वाया गेला आहे. शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करूनच परीक्षा घ्यावी अन्यथा आम्हाला आमची पूर्ण फिज आणि एक वर्षाची नुकसान भरपाई देण्यात यावी.” अशी मागणी विद्यार्थी प्रकाश साळवे ,अफताफ अन्सारी आणि इम्रान अहमद यांनी .टाटा इन्स्टिट्यूट च्या संचालक प्रा.शालिनी भारत यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
“आम्ही यासंदर्भात अनेक वेळा डीन मधुश्री शेखर याना प्रत्यक्ष भेटून आणि मेल द्वारे तक्रार केली परंतु त्याचे निवारण न झाल्याने आम्ही संचालक यांच्याकडे दाद मागितली -असे विद्यार्थी आफताफ अन्सारी यांनी सांगितले.
सदरील तक्रारींवर कार्यवाही न केल्यास आपणास दप्तर दिरंगाई कायद्यानुसार दोषी मानून योग्य ती कायदेशीर पावले उचलले जातील. त्याचबरोबर ग्राहक संरक्षण कायद्याच्या सेक्शन सहा दोन नुसार सेवेत कमतरता आणि खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याबद्दल मान्य ग्राहक संरक्षण न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल याची नोंद असावी असा इशाराही दिला आहे .
त्याबरोबर विद्यार्थ्यांनी विविध विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी यांच्याकडे धाव घेतली नॅशनल स्टुडंट्स युनियन चे संस्थापक अध्यक्ष ऍड दादाराव नांगरे म्हणाले की आम्ही यासंदर्भात टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथे स्कूल ऑफ व्होकेशनल एज्यूकेशन येथे प्रत्यक्ष तक्रार केली आहे .आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून विद्यार्थ्यांची फसवणुक खपवून घेतली जाणार नाही त्यावर योग्य ती कायदेशीर पाऊले उचलली जातील .असे संस्थापक अध्यक्ष यांनी कळविले

दादाराव नांगरे
संस्थापक अध्यक्ष
नॅशनल स्टुडंट्स युनियन.
7977043372
nationalstudentsunionnsu@gmail.com

विद्यार्थी संपर्क
प्रकाश साळवे
7972585624
salveprakash2023@gmail.com

प्रा.शालिनी भारत,
संचालक
02225525202
02225525050

Previous articleमहाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्यातर्फे नाशिकला प्रथमच संधी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय
Next articleनाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष..