Home Breaking News प्राथमिक शिक्षणाधिका-यांचा ‘शिक्षक भारती’ करणार निषेध

प्राथमिक शिक्षणाधिका-यांचा ‘शिक्षक भारती’ करणार निषेध

अनुदानाचे शाळाना पत्र प्राप्त न झाल्याने असंतोष

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा परिषद भूमीराजा न्यूज़
मो. नंबर -8983319070

शासनाने नवीन 20%व वाढीव 40% शाळाना अनुदाना साठी पात्र केले आहे. तसे अनुदान ही प्राप्त झाले आहे. त्यामुळे 21 वर्षापासून विनावेतन काम करत असणा-यांना आता कुठे तरी अशेचा किरण दिसायला लागले, परंतु प्राथमिक शिक्षणाधिका-यांच्या नाक़र्तेपणामुळे जिल्यांतील प्राथमिक विभागात एकाही शाळेला अनुदानाचे पत्र प्राप्त झालेले नाही. यास प्राथमिक शिक्षणाधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप करत शिक्षक भारती संघटनेच्या वतीने सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदे समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी अधिनस्त अधिका-यांना रोस्टर तपासणी बाबत चुकीचे आदेश देत आहेत. शासनाच्या सुचना प्रमाणे प्रक्रिया होत नसल्याचा आरोप संघटनेन केला आहे. अनुदानास पात्र सर्व शाळा प्रतिनिधिनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक भारतीचे विभागीय राजेंद्र लोंढे यांनी केले आहे.

Previous articleआमदार जवळगावकर यांनी केले गायकवाड परीवारांचे सांत्वन!
Next articleपत्रकारांना धमकी देणाऱ्यास होणार दंड ५०,०००/-, ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो.