भूमीराजा न्यूज प्रतिनिधी / संतोष मोरे
बाळापुर:- अकोला जिल्ह्य परिषद आरोग्य विभागाने जिल्हा स्तरीय आशा स्वयंसेविका ऊत्कृष्ट गटप्रवर्तक त्याचप्रमाणे तालुका स्तरीय ऊत्कृष्ट आशा स्वयंसेविका ह्यांची निवड समिती तालुक्यातील तिन आशा स्वयंसेविका हयांची प्रथम व्दितीय व तृतीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील सविता अंबादास इंगळे ह्यांना प्रथम तर व्दितीय क्रमांक बोरगांव वैराळे येथील आशा स्वयंसेविका सुजाता अनिल खंडारे तर तृतिय क्रमांक पारस येथील आशा स्वयंसेविका मिरा संजय तायडे ह्यांना देत सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे बोरगांव वैराळे येथील आशा स्वयंसेविका सुजाता अनिल खंडारे ह्यांनी कोरोणा काळात केलीली कामगीरी की त्यांनी गावातील लोकांना कोरोणा लस घेण्यासाठी प्रोत्साहित करुन घरोघरी जाऊन १०० टक्के लोकांना लस येण्यासाठी प्रोत्साहित केले. तर आज रोजी ज्यांचे वय १४ ते १५ वर्ष आहे अशा किशोरवयीन मुलींना आरोग्य विभागामार्फत गर्भाशयाचा कर्करोग होऊ नये म्हणून लसीकरण करत असून लसीकरण बाबत ग्रामस्थांमध्ये असलेल्या गैरसमज दुर करीत गावातील मुलीचं १०० टक्के लसीकरण करून घ्यावे यासाठी बोरगांव वैराळे येथील सरपंच कल्पनाताई वैराळे ह्यांचे साथ घेत गावात मार्गदर्शन करीत आहेत. तसेच गांव १०० टक्के क्षयरोग मुक्त करण्यासाठी सरपंच कल्पनाताई वैराळे व आशा स्वयंसेविका सुजाता अनिल खंडारे ह्यांचा मोलाचा वाटा आहे.
तसेच गावातील सुजाता अनिल खंडारे ह्यांना तालुका स्तरीय ऊत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार देण्यात आला बाबत त्यांचे गाव व परिसरातून अभिनंदन होत आहे
सरपंच कल्पनाताई वैराळे राजेश्वर वैराळे उपसरपंच
श्रीकृष्ण वेते माणिकराव वानखडे पुष्पा वाकोडे
शुभांगी अमरावते दिपाली बाहकर
मंगेश वैराळे सदाशिव गावंडे सुनील तावडे पुरुषोत्तम डोंगरे
आदींनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले प्रसंगी
गटप्रवर्तक रुपाली कोल्हे
वर्षा वैराळे विद्या गोसावी सुमन अमरावते आदी उपस्थित होते.




