Home कृषीजागर जिल्ह्यात पुन्हा पाऊस सुरू ! शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत !

जिल्ह्यात पुन्हा पाऊस सुरू ! शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत !

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 26 जुलै 2022

संबंध जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून कमिअधिक सारखा पाऊस पडत आहे. दोन लाख सत्यानव हजार हेक्टर शेतीला फटका बसला आहे. प्रचंड प्रमाणात शेतक-यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी विविध राजकीय कार्यकर्ते करीत आहेत.
तसे निवेदन तहसीलदार साहेब यांना देण्यात आले आहे.
विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे. तरीही नव्याने निर्माण झालेल्या शिवसेना भाजप सरकारने अजुन तरी सरसकट मदत जाहीर केलेली निदर्शनास आले नाही.

“हे तलाव नसुन शेतात साचलेल पाणी आहे”


यावर्षी काही शेतकऱ्यांनी बटाव, खंडाने केलेली शेती पावसामुळे सोडुन दिली आहे. एवढी प्रचंड नुकसान शेतीचे झाले आहे. शेतात पिकातील आंतरमशागतीची कामे पुर्णतः बंद आहेत. डवरणे, कोळपणी करणे, निंदणी करणे, खते टाकणे, फवारणी करणे यासारखी अति महत्वाची कामांना ब्रेक महिनाभरापासून लागला आहे.
शेतमजुरांच्या हाताला काम नाही. शेतक-यांच्या डोळ्यात निराशेचे भाव दिसत आहेत. येणारे सन कसे साजरे करायचे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
राज्यसरकारने ताबडतोब प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाची मदत द्यावी. अशी मागणी होत आहे.
👉 बियाणे, खते , टॅक्टरचा खर्च, मजुरांचा खर्च वाया गेला.
सततधार पाऊस पडत असताना, आजतागायत शेतात केलेला सर्व खर्च केला नाही असता तर. त्यांवर झालेल्या जो खर्च आहे. तेवढ्यात आमचे वर्षभर जगत होतो. असा एका शेतकऱ्याने बोलुन दाखवले आहे.

Previous articleखडकी बाजार,(तांडा‌) येथे देशी दारू विक्री जोमात; त्यामुळे येथील तरुण पिढी देखील दिवसभर राहतात नशेच्या कोमात …
Next articleअखेर भूमिराजा बातमीची दखल घेत; रस्त्यावरील काटेरी बाभळी तोडल्या.