Home गुन्हेवृत्त खडकी बाजार,(तांडा‌) येथे देशी दारू विक्री जोमात; त्यामुळे येथील तरुण पिढी देखील...

खडकी बाजार,(तांडा‌) येथे देशी दारू विक्री जोमात; त्यामुळे येथील तरुण पिढी देखील दिवसभर राहतात नशेच्या कोमात …

👉🏼 या अवैध धंद्यामागे पोलीस प्रशासनाचे आशीर्वाद असल्याचे गावाकऱ्यांचे आरोप…

भूमीराजा न्यूज , प्रतिनिधी
कृष्णा राठोड, मो- 9145043381

हिमायातनगर:-
तालुक्यातील खडकी बाजार (तांडा) येथे सर्रास देशी दारू , हातभटटी , विक्री जोमात चालू आहे. यामुळे येथील तरुण, अल्पयीन मुले देखील व्यसनाधीन होत आहेत. या गावामधे कितीतरी वर्षांपासून हे अवैध धंदे सर्हास चालू असून देखिल याकडे पोलीस प्रशासन काना- डोळा करत असल्याचे दिसून येत आहे.
येथील गावातील नागरिकांना जवळ दारू मिळत असल्याने ते दिवसभर दारूच्या नशेत राहतात व यामुळे त्यांच्या परिवारिक भांडणे देखिल होतात.
या गावामध्ये दिवस- रात्र दारू विक्री बरोबरच , खडकी बाजार येथून सरसम, घारापूर , पावनमरी या गावांना देखील देशी दारूचा पुरवठा करत असल्याचेही समजले जाते. असे असताना देखील पोलीस प्रशासन यावर कठोर कारवाई करून पूर्णपणे दारू बंदी का करत नाही , असा सवाल येथील सुजाण नागरिक, स्त्रिया कडुन बोलले जात आहे.
खडकी तांडा (गाव) येथील दारू विक्रेते पोलीस प्रशासनास आपले हप्ते देऊन हे अवैध धंदे चालवत असल्याचे आरोपही खडकी तांडा येथील नागरिकांनी केले आहे.
खडकी तांडा येथील देशी दारू, हातभटटी , हे अवैध धंदे पूर्णपणे कायम चे बंद करून तरुण पिढी व्यसनाधीन होण्यापासून वाचवण्याचे काम पोलीस प्रशासनाने करावे , अशी मागणी येथील गावाकऱ्यांनी केली आहे.

Previous articleरोहयो फळबाग लागवड योजनेतील लाभार्थ्यांची होतेय कर्मचा-याकडून प्रचंड लूट
Next articleजिल्ह्यात पुन्हा पाऊस सुरू ! शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत !