Home Breaking News साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकस्वराज्य आंदोलनाच्या पोटा बु.येथे ‘गाव शाखा फलकाचे”...

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकस्वराज्य आंदोलनाच्या पोटा बु.येथे ‘गाव शाखा फलकाचे” उद्घाटन व अनावरण..

👉🏽अण्णाभाऊचें साहित्य म्हणजे वास्तव जीवनाकडे नेणारे साहित्यतच आहे … प्रा.रामचंद्र भरांडे

भूमिराजा न्युज शहर प्रतिनिधी,
कृष्णा राठोड – ९१४५०४३३८१

हिमायतनगर :-
मौजे पोटा बु.येथे लोकशाहीर,साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकस्वराज्य आंदोलनाच्या आज गांवशाखेच्यां फलकाचे उद्घाटन व अनावरण करण्यातआले.त्यांनतर दुपारी ठिक तीन वाजता सभागृहात मध्ये जाहीर सभेला सुरुवात झाली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अर्जुन गायकवाड मराठवाडा संघटक,संजय खानजोडे मराठवाडा कामगार आघाडी सरचिटणीस,किशनराव पोतरे,माणिक कांबळे बारडकर जिल्हाध्यक्ष उत्तर, माधवराव सांवत,पोलीस पाटील आराध्ये,गंगाधर वाघमारे,डॉ.विजय पिन्नालवार,परसराम भालेराव,पत्रकार दशरथआंबेकर,राम चिंतलवाड,तलवारे सर,दिगांबर गायकवाड,करण आंबेकर,दगडु खरोडे,आदी जण उपस्थित होते.तर जाहीरसभेतुन प्रमुख मार्गदर्शन करताना प्राध्यापक भरांडे सर म्हणाले की,अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे वास्तव्य जीवनाकडे घेऊन जाणारे दलित साहित्याचें लेखन होय.त्यांनी समाजातील विविध स्तरांवर काम करणाऱ्या घटकांतील पैलूवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून वास्तववादी भूमिकेतून समाजाला जागृत करण्याचं काम केलेआहे.त्यांच्या लेखणीतून निर्माण झालेले साहित्य हेअनमोल असून,महामानवांच्या विचारांची आज समाजातील प्रत्येक घटकांना गरज आहे.त्याच्यां विचारधारेवर आपले जीवन व्यतीत करून आपणाला ही समाजाकरिता काही तरी देणेआहे.याची जाणीव मनात ठेवून काम करावे आणि समाजाच्या हिताचे प्रश्न वेळो वेळी रस्त्यांवर संघर्ष करून मार्गी लावावेचं लागतात.तुम्ही संघर्ष करण्याची तयारी ठेवा,मी तुमच्या सोबत कायम राहील.महापुरुषांच्या सखोल विचारधारेवरचं आपल्या देशांचे भवितव्य अवलंबून आहे.आजची राज्यव्यवस्था तळागाळातील गोरगरिबांच्या हिताची नसून शोषणाच्या बाजूच्या विचाराची आहे.शहरी भागासह ग्रामीण भागातही आज गोरगरिबांच्या मुला बाळांना दर्जेदार मोफत व सक्तीचे शिक्षण मिळत नसल्याने समाजातील युवक, युवती,लहान मुलांमुलीं यात मोठे नुकसान होतआहे.जोपर्यंत आपण शिकणार नाही आणि शिकुन संघटित होणार नाही?तोपर्यंत आपल्याला कोणताही न्याय मिळणार नाही.असेही ते म्हणाले गेल्या वीस वर्षापासून आम्ही लोकस्वराज्य संघटनेच्या माध्यमातून

एस.सी.समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लावून धरलाअसून वेळोवेळी आम्ही रस्त्यांवरील त्या परिस्थितीत आंदोलनेही केले.पण अनेक ठिकाणचे मोर्चे,आंदोलने या सरकारने दडपण्याचा प्रयत्न केला असला तरीही,आम्ही आमचा मार्ग केव्हाच बदलू शकत नाही. समाजा साठी समाजाच्या हितासाठी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत माझा व माझ्या कार्यकर्त्यांचा संघर्ष चालूच राहील.अशी ही ग्वाही त्यांनी उपस्थित समाज बांधवांना दिलीआहे. दीनदुबळ्या समाजातील व्यक्तींनी आपल्या कुटुंबातील मुलां बाळांना दर्जेदार शिक्षण देऊन समाजात चांगले अधिकारी निर्माण करावे लागतील. शिक्षणाशिवाय माणसाला तरुणोउपाय नाही.शिक्षणानेच मानवी जीवनामध्ये क्रांती घडू शकते हेआपल्या महामानवाने आपल्याला दाखवून दिले आहे.मग त्यांच्याच विचाराची आज तुम्हा,आम्हाला अत्यंत गरज आहे. आणि ते विचार आत्मसाथ करणे गरजेचे आहे.समाजाच्या हितासाठी अहोरात्र काम करावे लागेल.समाजाने केलेले संघटनाचे कार्य उल्लेखनीय आहे.त्यांनी नवीन शाखेच्या संघटनेतील शाखा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.भावी काळासाठी समाज हिताचे कार्य करावे .असाही शेवटी म्हणाले आहे.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन लोकस्वराज्य संघटनेचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष धोंडोपंत बनसोडे यांनी केले.तर उपस्थित सर्व समाज मंडळीचे आभार संतोष हातवेगळे जवळगांवकर यांनी मानले.या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम आनंदराव जळपते,रामदास जळपते अशोक जळपते,गजानन कराळे,रेशमाजी गुणाजी,संभाजी अंबाजी,देविदास जळपते,जळबा जळपते,मुंजाजी जळपते,आदीनी घेतले आहे.

Previous articleलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.
Next articleहिमायतनगर पोलीसांनी केले शहरात पथसंचलन.