Home Breaking News जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांना डॉ.शंकरराव चव्हाण पत्रकारिता पुरस्कार जाहीर ….

जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांना डॉ.शंकरराव चव्हाण पत्रकारिता पुरस्कार जाहीर ….

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी

हिमायतनगर तालुक्यातील सवना गावात अत्यंत गरीब कुटुंबात जमलेले परमेश्वर राव गोपतवाड यांचा जिवणप्रवास अत्यंत बिकट परस्थितीतुन निघाला तिमीरातुनी तेजाकडे या म्हणी प्रमाणे एक पेपर विक्रेता ते सवना गावचे सरपंच, से, स, सोसायटी चेअरमन, कृषी उत्पन्न बा, समिती सभापती, आहे अनेक पद आली असतांना सुध्दा कधीही जनसामान्यांच्या कामात त्यांनी तिळमात्र कमतरता येउ दिली नाही अनेक युवा पत्रकारांना घडवण्याचे काम त्यांनी केले. सवना गावासह तालुक्यातील कोणत्याही गावात लग्न समारंभ आयोजित किंवा अंत्यविधी असो ते सुख किंवा दु:ख या कामात हिरिरीने सहभागी होतात तालुक्यातील जनतेमध्ये त्यांना मानणारा वर्ग भरपुर प्रमाणात असल्यामुळे ते थोरापासुन ते मोठ्या प्रमाणात परिचित आहेत आज पर्यंत अनेक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत . राजकिय प्रवास करतांना सुध्दा सर्व कार्यकर्त्यांना सहकार्यांची वागणुक देत राजकीय प्रवास केल्याचे त्यांच्या समर्थकातुन बोलल्या जाते कधीही कुणालाही कोठेही मदत लागल्यास ते निस्वार्थ पणे पुढाकार घेऊन त्यांना मदत करतात नुकताच त्यांना डाॅ. शंकरराव चव्हाण पत्रकारीता पुरस्कार जाहीर झाल्याने सर्व स्तरातून त्यांचा अभिनंदन सत्कार होत आहे.

Previous articleहिमायतनगर महावितरण कंपनीच्या अभियंत्याची कार्यालयाला दांडी…..
Next articleक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन.