Home Breaking News पोलीस भरतीसाठी फॉर्म भरण्याची तारीख वाढविण्यात यावी – वंचित बहूजन युवा आघाडी.

पोलीस भरतीसाठी फॉर्म भरण्याची तारीख वाढविण्यात यावी – वंचित बहूजन युवा आघाडी.

योगेश घायवट :- तालुका प्रतिनिधी भूमीराजा
अकोला, दि. २७ – पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण तरूणीची प्रचंड मेहनत घेत आहेत मात्र वेबसाईटवर अर्जच भरला जात नसल्याने उमेदवारांमध्ये असंतोष पसरला आहे.राज्य सरकारने अर्ज भरण्याची तारीख आणखी १५ दिवस पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी वंचित बहूजन युवा आघाडीचे वतीने प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.

राज्यात पोलिस शिपाईच्या १८ हजार पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे.मात्र अखेरच्या दिवस जवळ आलेला असताना मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अर्ज भरल्या जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत.फॉर्म रजिस्टर न होणे, पैसे भरले न जाणे, सबमिट न होणे अश्या अडचणी येत आहेत. रात्री उशिरापर्यंत अनेकांनी प्रयत्न केले परंतु त्यांना अर्ज भरता आलेले नाहीत. अर्जच भरला जाणार नसल्याने आपली फसवणूक झाल्याची भावना ह्या भरती साठी तयारी करणाऱ्या तरुण तरुणीना वाटत आहे.

ह्या पूर्वी कोणत्याही एका गटात एकच अर्ज भरण्याची अट यामध्ये घातलेली आहे.परंतु, आता पोर्टलवर एकच अर्ज केल्यानंतर दुसरा अर्ज भरता येत नाही, असा अर्ज बाद ठरविला जाणार आहे.तसेच क्रिमीलेयरची अट देखील आहे.त्यामुळे पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या हजारो बेेरोजगार तरुण तरुणीची अडवणूक करण्यात येत होती.

एकतर शारीरिक चाचणीत कोणत्याही कारणाने बाद होण्याची शक्यता असते. अशावेळी पुन्हा तयारी करून दुसऱ्या जिल्ह्यासाठी प्रयत्नात यशस्वी होण्याची संधी असते. मात्र, आता ती मिळणार नाही. अशावेळी वयोमर्यादा ओलांडलेल्या आणि शेवटची संधी असलेल्या उमेदवारांचे मोठे नुकसान होणार आहे.सरकारने तात्काळ ह्याची दखल घेवून फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घ्यावा.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेत ही भरती सुरू झाली आहे, अश्यावेळी जाचक अटी टाकून आणि बंधने लादून सरकारने बेरोजगार तरुण तरुणीच्या भवितव्याचा खेळ खंडोबा सुरू केला आहे.त्यात आता ऑनलाईन अडवणूक केली जात आहे.त्यासाठी वंचित युवा आघाडी त्वरित मुदतवाढ निर्णय घेण्याची मागणी मुख्यमंत्री आणि राज्यपाल ह्यांना पाठविलेल्या ई मेल द्वारे करीत आहे.

राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहूजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश.
9422160101

Previous articleकै लक्ष्मणराव मादसवार अनंतात विलीन; अंत्यविधीस हजारोंचा जनसमुदाय उपस्थित
Next articleभारत की जान है,भारत की शान है,भीमजी तुम्हारा संविधान है” महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने भारतीय संविधान दिनी बहरला संविधान शाहिरी जलसा*