Home Breaking News पातूर तालुक्यांतील मळसुर गावात अग्नी तांडव..!

पातूर तालुक्यांतील मळसुर गावात अग्नी तांडव..!

गावातील चार ते पाच घरे पैसे कागदपत्रे कपडे मौल्यवान वस्तू जळून खाक..!

नासिर शहा
पातूर तालुका प्रतिनिधी

पातूर तालुक्यांतील मळसुर गावात मंगळवारी दुपारी अचानक आग लागल्याने अग्निचा रौद्र रूप धारण करून चार ते पाच घरे तर सहा गोठे जळून खाक झाले आहे
या आगी मध्ये हात मजुरी करणाऱ्या कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून येथील संदीप तायडे मोल मजुरी करून घरातच पेटीत ठेवलेली दीड लाख रुपये रोख रखमे सह संपूर्ण घरचं जळून खाक झाले तसेच गोपाल तायडे, किशोर तायडे, गोविंदा राखोंडे,सखाराम राखोंडे यांच्या घरातील दाळ दाना मूळ कागदोपत्री जळून भस्मसात झाली तसेच इतरही घरातील साहित्य जळून नष्ट झाले या घराच्या लागतच असलेल्या उतम तायडे, किशोर राखोंडे, रमेश राखोंडे, राजेन्द्र तायडे, गोविंद तायडे यांच्या गोठ्या मधील शेती साहित्य व उपयुक्त साहित्य जळून खाक झाले गुरान साठी जमा केलेला चारा जळून खाक झाला सदरच्या अग्नितांडव मध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून बहु संख्य नागरिकानी तातडीने आग विजवण्यासाठी धावपड केली मात्र जवळपास पाणी उपलब्ध नसल्याने त्यांना यश आले नाही पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करून चार ते पाच घरांना आपल्या भक्षस्थानी घेतले या आगीत घरातील धान्य कागदपत्रे कपडेलत्ते संसार उपयोगातील साहित्य व सर्व आगीच्या भक्ष्यस्थानी आले उघड्या डोळ्यांनी आपले घर पेटताना पाहिले त्यामुळे सर्व कुटुंब उघड्यावर आले आहे घरांना आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घरांना लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनाने सदर घटनेची तात्काळ चौकशी व पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत करण्याची मागणी होत आहे

Previous articleपेरणीपूर्व मशागतीला सुरुवात.
Next articleऑनलाईन प्रणालीच्या अडचणी मुळे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी उचलता येत नसेल तर………