Home Breaking News डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती खामगाव येथे धुमधडाक्यात साजरी

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती खामगाव येथे धुमधडाक्यात साजरी

शहर प्रतिनिधी खामगाव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १३२ वी जयंती खामगाव शहरात मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
त्यांनतर समता क्रीडा मंडळातर्फे शहरातील मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात आली. शहरातील सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर शहरातील अनेक सामाजिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून भीम जयंती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सार्वजनिक जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समता क्रीडा मंडळाची कार्यकारणी यांनी परिश्रम घेतले..

Previous articleसंभापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.
Next articleडॉ. मनोरमा व प्रा. ह. शं. पुंडकर महाविद्यालय, बाळापूर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी