Home समाजकारण हिमायतनगर तालुक्यातील प्रभुश्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा ….

हिमायतनगर तालुक्यातील प्रभुश्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा ….

मारोती अक्कलवाड
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 10 एप्रिल 2022

भारतीय संस्कृती प्रमाणे संबंध देशात देवाधिदेव, श्रीरामप्रभुचा जन्मोत्सव सोहळा सर्वत्र मोठ्या थाटामाटात साजरा होत असतांना, हिमायतनगर तालुक्यातील शहरात, आणि ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यात मोठ्या हर्ष उत्साहात रामनवमी साजरी होत आहे.
एकवचनी, सत्यवचनी, मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामजी जन्मोत्सव भारतीय संस्कृतीच्या तिथीप्रमाणे, दरवर्षीप्रमाणे आज दिनांक- दहा एप्रिल रोजी हिमायतनगर शहरात मोठ्या थाटामाटात भव्य प्रभु श्रीरामाचा फोटो ठेवुन, रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये तालुक्यातील तथा ग्रामीण भागातील सर्व रामभक्त मोठ्या प्रमाणात सामील झाले होते.
सर्वप्रथम प्रभु श्रीरामाच्या मूर्तीना मान्यवरांनी पुष्पगुच्छ अर्पण केले.
भारुडी भजणी मंडळ आणि राम भक्तांनी भव्य श्रीरामप्रभुच्या प्रतिमेला आदराने नमन करून, भजनी मंडळाने रामचा गजर करत अख्ख्या शहरवासीयांना मंत्रमुग्ध करणारा होता.
यावेळी तालुक्यातील सर्व मान्यवर उपस्थित होते. सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सर्वत्र प्रभु श्रीरामाच्या जयघोषाने हिमायतनगर नगरी दुमदुमून गेली.

Previous articleसंजय बियाणी यांच्या हत्येच्या तपासासाठी खासदार चिखलीकर यांनी घेतली, केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट
Next articleज्योतिबा ची शाळा