Home Breaking News हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत दलालांचा सुळसुळाट…….

हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत दलालांचा सुळसुळाट…….

बँकेचे कर्मचारी आणि दलाल यांच्यामद्ये आर्थिक सामंजस्य असल्याचे आरोप……

हिमायतनगर :- कृष्णा राठोड
तालुक्यातील एकमेव शेतकऱ्यांची कामधेनु व शेतकऱ्यांना विविध अनुदान प्राप्त करून देणारी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा हिमायतनगरात कार्यरतआहे.पण हि ईमारत मोडकळीस आली आहे.भविष्यात
या इमारतीचा अपघात होण्याची शक्यता आहे.या बँकेमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना शेतीचेअनुदान वाटपाचे कामे सुरूआहेत.परंतु गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये अनुदान वाटप करतअसताना मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून होतआहे.नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचारी आणि बँकेत काम करणारे दलाल यांच्या संगनमताने गैरप्रकारात वाढ होत,असल्याने या ठिकाणी अल्पभुधारक,कोरडवाहू,वंचित, गरीब,लाच नदेऊ शेतकणाऱ्यां शेतकरीवर्गाचें कामे वेळेवर होत नसल्याने संतापची लाट निर्माण झाली असल्याचे यावेळी सांगितले जात आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेत चालू असलेल्या अनुदान वाटप गावाऐवजी दुसऱ्यांच गावातील शेतकऱ्यांचे अनुदान वरील पैसे काढून देणे, खातेदारांच्या सहमतीऐवजी डमी खातेदारांच्या सह्या दाखवून अनुदान काढणे,नातेवाईकांच्या संमतीविना अनुदानमधील पैसे दलालामार्फत काढून दिले जातआहे.खोटी कागदपत्रे सादर करुन तालुक्यातील देवस्थानच्या जमिनीवर अनुदान, गायरान,गावठाण,

साठवण तलाव,गावतलाव लगत असलेल्या शेतजमिनीं वरील अनुदान उचलून घेतले जाते आहे.असे सर्रास प्रकार चालू असल्याचा वारंवार शेतकऱ्यांकडून तोंडीं तक्रारी होत आहे.याविषयी संबंधित शाखा अधिकारी यांना अशा गैरप्रकारबद्दल प्रस्तुत प्रतिनिधींनी विचारले असता, त्यांनी संचालक महोदयाच्यां नातेवाईकांकडून एखाद्या शेतकऱ्यां विषयी शिफारसआली,तर आम्ही नियमानुसारच त्यांना अनुदानावरील पैसे वाटप करतो,म्हणून संबंधित बँक कर्मचाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहे.तर आमच्या बँकेत असा कोणताच गैरप्रकार होत नाही,केवळ काही शेतकऱ्यांचीं कामे न झाल्याने असे बिनबुडाचे आरोप केले असावे. असाही सूर त्यांनी यावेळी लावला आम्हाला सिओ कदम साहेब नांदेड यांनी बँकेचा कारभार अतिशय चांगला असल्याचा शेरा दिलाआहे.असे त्यांनी सांगितले.आम्ही कामे चांगले केल्याचा उल्लेख करून एक प्रकारे वरिष्ठांचा या गैरप्रकारांना पाठिंबांच असल्याचा सुतोवाच त्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे.बँकेत व्यवहार पारदर्शक आणि चांगल्या प्रकारे,दलालमुक्त अनुदान वाटप करीत असल्याचा त्यांनी आपल्या बाजूमध्ये सांगितले आहे.

परंतु प्रत्यक्ष बँकेत दलाला शिवाय काहीही कामे होत नाहीत.तर सायंकाळी पाच ते सहाच्यां वेळेत बँकेत गैरव्यवहारांची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर चालु असल्याचे बोलले जातआहे.आणि याविषयी संचालक मंडळ, लोकप्रतिनिधी या गैरप्रकारावर काहीच बोलायला तयार नसल्याचे यावेळी दिसून येतआहे. बँक दलाल मुक्त कधी होणार? व शेतकऱ्यांची, सर्वसामान्यांची कामे पैसे न देता कधी होणार?हेअद्याप बँक शाखा प्रशासनाने खुलासा केला नसल्याचे दिसून येतआहे.यामुळे शेतकरीवर्गाची नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये दिवसा ढवळ्या पिळवणुक होत असल्याचा प्रकार यावेळी दिसून येतआहे.याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने व विशेसता डॉ.विपिन ईटणकर जिल्हाधिकारी नांदेड,कदम मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

हिमायतनगर ,भूमीराजा न्यूज, शहर प्रतिनिधी ,
कृष्णा राठोड बोरगडीकर

Previous articleएक आगळा वेगळा विवाह सोहळा सिन्नर तालुक्यातील उजनी येथे संपन्न
Next articleलोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचा कारभार दोनच शिक्षकांच्या भरोशावर. .