Home Breaking News लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचा कारभार दोनच शिक्षकांच्या भरोशावर. .

लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचा कारभार दोनच शिक्षकांच्या भरोशावर. .

संतोष मोरे /भुमीराजा न्यूज लोहारा .

लोहारा:- बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत दोनच शिक्षक आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत १ ते ४ पर्यंत वर्ग खोल्या आहेत.माञ येथे चार ते पाच शिक्षकाची गरज असतांना येथे जिल्हा परिषद कडु तीन शिक्षक दिले आहेत त्यातील एक शिक्षक हे दिव्यांग आहे ते विद्यार्थ्यांना शिकू शकत नाही त्यामुळे ते शिक्षक असून नसल्यासारखे आहे तरी लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोणतेही अधिकार किंवा राजकीय नेते लक्ष देण्यास तयार नाहीत निवडून आले की नेतांना कोणाचे देणे घेणे नसते. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. येथील शाळा समिती, अध्यक्ष व उपाध्यक्ष झोपेत असल्याचे चित्र जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मागील दोन ते तीन वर्ष कोरोना मुळे शाळा बंद होत्या त्यामुळे सुध्दा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आता एक वर्ष ही शाळा सुरू झाल्या आहेत.त्या शिक्षकाची कमी त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तरी याकडे कोणतेही अधिकार लक्ष देण्यास तयार नाहीत. लोहारा येथे दोन शाळा आहेत .जिल्हा परिषद मराठी शाळा व उर्दू प्राथमिक शाळा आहेत येथे कित्येक वर्षांपासून आ.रो फिल्टर आहे ते सुध्दा बंद .या आ रो फिल्टर चालु करण्यासाठी नागरिकांनी कित्येक वेळा शाळेकडे मागणी केली आहे.तरी दोन्ही शाळेतील मुख्याध्यापक चालु करतो असे उत्तर देता परंतु आतापर्यंत चालु केलेले नाहीत त्यामुळे लहान विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी आपल्या घरुन आणावे लागते या आ.रो फिल्टर च्या बातमी कित्येक वेळा प्रकाशित करण्यात आला तरी पण आरो फिल्टर चालु करणात आले नाही.या शाळेची इमारत जुनी आहे ते पडण्याचा मार्गावर आहे तरी सुध्दा जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील शिक्षक लक्ष देण्यास तयार नाहीत अशा अनेक समस्या या शाळेमध्ये आहे. तरी याकडे कोणी लक्ष देणार का असे प्रश्न येथील पालक वर्ग करीत आहे. ग्रामीण भागातील शाळे कडे कोणतेही अधिकार लक्ष देत नाहीत त्यामुळे येथील शिक्षक सुत शिक्षक अधिकार मस्त विद्यार्थ्यां ञस्त झाले आहेत. त्यामुळे नागरीक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे आपल्या मुलांचे नाव टाकनात नाही. व इंग्लिश शाळेत आपल्या मुलांचे नावे टाकता . इंग्लिश शाळेला पहिली पसंती दर्शवतात तरी लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रिक्त असलेल्या जागा भरावे अशी विनंती येथील पालक वर्ग व गावातील नागरिक करीत आहे. तरी जिल्हाधिकारी साहेब यांनी यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Previous articleहिमायतनगर तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत दलालांचा सुळसुळाट…….
Next articleऊसाच्या उत्पादन वाढीकरीता ड्रोनने विद्राव्य निवीष्ठांची फवारणी करणे आवश्यक-पूर्णा सहकारी साखर कारखान्याने केले प्रात्यक्षिक यशस्वी!