Home Breaking News – – – तर नाशिक शहरातील कलाकारांचा चित्रपट महामंडळ निवडणुकीवर बहिष्कार

– – – तर नाशिक शहरातील कलाकारांचा चित्रपट महामंडळ निवडणुकीवर बहिष्कार

नाशिकचे मतदान केंद्र डावलल्याने कलाकारांचा आक्रमक पवित्रा

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर झाली. त्यातील पहिल्या निवडणुक कार्यक्रमात नाशिक ला मतदान केंद्र देण्यात आले होते. तर पुन्हा दुसरा निवडणूक कार्यक्रम ज़ाहीर झाला. त्यात नाशिक सह अनेक ठिकाणचे मतदान केंद्र रद्द करण्यात आल्याचे दिसत असल्याने मतदानासाठी मुंबई, पुणे, किंवा कोल्हापुर ला आम्ही जाणार नाही. सगळेच निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा पवित्रा चित्रपट महामंडळाच्या उत्तर महाराष्ट्राचे काम चालणाऱ्या नाशिक शाखेच्या पदाधिकाऱ्यानी पत्रकार परिषदेत जाहीर केला. दरम्यान रात्री उशीरा कोल्हापुर धर्मदाय आयुक्तानी नव्याने निवडणूक कार्यक्रम देण्याचे आदेश दिल्याने त्या कार्यक्रमात तरी नाशिक केंद्र मिळते का नाही याकडे आता कलाकरांचे लक्ष लागले आहे.
चित्रपट महामंडळाची निवडणुक ज़ाहीर झाली आहे. अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमात नाशिक ला मतदान केंद्र दिलेले आहे, तर प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांनी जाहीर केलेल्या निवडणुक कार्यक्रमात मतदान केंद्र नाही. राज्यभरातील सभासदांना मतदाना पासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार असल्याचे समितीचे अध्यक्ष श्याम लोढ़े यांनी सांगितले. यावेळी समितीचे सुनिल ढगे, रवी जन्नावार, धंनजय धुमाळ, रफिक सय्यद, योगेश थोरात, राजेश भरत जाधव, उमेश गायकवाड, याच्या सह पदाधिकारी, कलाकार, सभासद उपस्थित होते.

Previous articleवाशी तांडा येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकास दिले निवेदन……!
Next articleसंभापूर येथे जनावरांवर आलेल्या लंपी रोगाची प्रतिबंधक लसीकरण यशस्वीरीत्या पूर्ण..!