Home Breaking News शेतकऱ्यांनी निराश न होता. बुद्धीला चालना देऊन शेती करावी..

शेतकऱ्यांनी निराश न होता. बुद्धीला चालना देऊन शेती करावी..

👉 प्रगतशिल शेतकरी गोविंदराव राघोजी सुरोशे यांचे मत.

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 21/11/2022
हिमायतनगर तालुक्यातील मौजे कार्ला पी. येथील शेतकरी प्रगतशील शेतकरी गोविंदराव राघोजी सुरोशे यांनी तालुका कृषी कार्यालय हिमायतनगर नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत सर्वे नंबर 72 वर 50 आर क्षेत्रावर पेरू या फळपिकाची लागवड दोन वर्षांपूर्वी केली आहे.
त्यांना या पेरु फळपिकांचे प्रतिदिन 2000 रुपये महिन्याला सरासरी 60000 निव्वळ नफा त्यांना आज रोजी मिळत आहे.
आपली शेती आपल्या वडीलोपार्जीत शेती आहे. तीची सेवा आपणासहित कुटुंबातील सर्व सदस्य मदत करतात. वय वर्ष 75 असणारे गोविंदराव सुरोशे काका नखचता, न डगमगता हिमायतनगर येथील बाजारपेठेत पेरु विकायला नेतात. आज रोजी त्यांना पेरुचे चांगले उत्पादन मिळू लागले आहे. माझ्या सह ईतर शेतकरी बांधवांनी निसर्ग चक्राला न घाबरता आपण आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करुन, कृषि विभागाच्या योजनेचा लाभ घेऊन, आपले शेतीतील आर्थिक प्रगती करावी. आणि आपले जिवणमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास, निश्चीतच यश शिखर गाठता येते. असेही सुरोशे काका म्हणाले.

Previous article*प्रत्येक अर्थशास्त्र अभ्यासकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावापुढे अर्थतज्ञ ही उपाधी लावावी ” – डॉ. संघर्ष सावळे*
Next articleमूर्तिजापूर | पीकविमा कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या ६ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल…