Home Breaking News रामकुंड, अहिल्या घाट, पंचवटी येथे भव्य-दिव्य ३०१ वा जयंती सोहळा उत्साहात संपन्न

रामकुंड, अहिल्या घाट, पंचवटी येथे भव्य-दिव्य ३०१ वा जयंती सोहळा उत्साहात संपन्न

श्री नर्मदा कलश पूजन व जलाभिषेक संपन्न

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमिराजा न्युज मो. नंबर – 8983319060

नाशिक :प्रतिनिधी (पंचवटी )पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने रामकुंड, अहिल्या घाट, पंचवटी येथे भव्य-दिव्य जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. धार्मिक, सांस्कृतिक व भक्तिमय वातावरणात हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पवित्र नर्मदा जलाने अभिषेक करण्यात आला. होळकर राजघराण्याचे उत्तराधिकारी महाराजा यशवंतराव होळकर (तृतीय) यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरातील अहिल्या स्मारकांसाठी नर्मदा कलश पाठविण्यात आला होता. त्याच परंपरेनुसार नाशिक येथील जयंती सोहळ्यासाठी प्राप्त झालेल्या नर्मदा कलशाचे पूजन करण्यात आले.

या प्रसंगी होळकर घराण्याचे वंशज मुकुंद राजे होळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, राजेंद्र बागुल तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते नर्मदा कलश पूजन व जलाभिषेक करण्यात आला.

समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधान बागल यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देत शिवसेना महिला जिल्हाप्रमुख संगीता ताई पाटील यांना ३०१ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षपदाचा मान देण्यात आला. त्यांच्या नियोजन व नेतृत्वामुळे संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

यावर्षीचा सोहळा “महाकुंभ” या संकल्पनेवर आधारित होता. त्यानिमित्ताने भव्य महा गोदावरी आरती व अहिल्यादेवी आरतीचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत रामकुंड व अहिल्या घाट परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला. आकर्षक सजावट, दीपप्रज्वलन, फुलांची आरास आणि धार्मिक विधींमुळे परिसराला आध्यात्मिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त झाले.

कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर भव्य आतषबाजी करण्यात आली. “लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो” या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

यावेळी मान्यवरांची मनोगते झाली तसेच त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विनायकजी काळदाते, दत्तूभाऊ बोडके, रामदास सकाळे, शशिकांत कोथमिरे, नगरसेविका सुलोचना होळकर, अमोल गजभार, नगरप्रमुख रागिनी बोराडे-धोंगडे, शिवसेना संघटक पिता गुप्ता, युवती विधानसभा प्रमुख अर्चना भाबड-गोसावी, वैभव रोकडे, अण्णासाहेब सपकाळ, राजाभाऊ बादाड,काळे ताई, देवरामभाऊ रोकडे, शिरोळे सर, मांडले सर, हेमंत शिंदे,आबासाहेब तरफले, प्रशांत बागल, भूषण जाधव,संदेश मोरे यांच्यासह सामाजिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने अहिल्याप्रेमी नागरिक उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा समाजात व्यापक प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व मान्यवर, स्वयंसेवक, सहकारी व उपस्थित नागरिकांचे आभार मानले.

Previous article“SIR मोहिमेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी BLO चे मित्र होऊन लोकशाहीचे रक्षक बनावे”