भूमीराजा न्यूज बाळापूर तालुका प्रतिनिधी/ संतोष मोरे
बाळापूर :- अहिल्याबाई होळकर सार्वजनिक वाचनालय नया अंदुरा ता. बाळापूर जि. तर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीचे औचित्य साधून तेल्हारा येथील ग्रंथ मित्र रामेश्वर पोहेकर व दहावी व बारावी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ वाचनालयाच्या वतीने सौ. विश्रांती ताई तायडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.मार्गदर्शक मिलिंद भाऊ तायडे हे होते.
प्रथमता पूर्ण श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस विश्रांतीताई तायडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच उपस्थितांनी पुष्प पूजन केले. ग्रंथमित्र रामेश्वर पोहेकर यांना नुकताच 2026 चाळीसगाव येथील नामांकित संस्थेतर्फे नवविचार रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल वाचनालयाच्या वतीने सचिव सौ. विश्रांतीताई तायडे व मिलिंद भाऊ तायडे यांच्या हस्ते ग्रंथ भेट व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे दहावी व बारावी मधील गुणवंत विशेषता वाचनालयाच्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी समर्थ आढाव 85% व सुपेश श्रीनाथ 73% गुण, प्रसेनजित हिवराळे, संस्कार इंगळे, दीपक चंदनशिव, संतोष येरोकार, प्रसेंजित तायडे यांचा सुद्धा ग्रंथ भेट, स्पर्धा वार्ता साप्ताहिक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रंथमित्र रामेश्वर पोहेकर यांनी सांगितले की, जीवाचा आटापिटा केल्याशिवाय ज्ञानाच्या वाटा सापडत नाही आणि जीवाचा रान केल्याशिवाय विद्येचं उद्यान फुलत नाही अशा प्रकारे ज्ञान ,विद्या ग्रंथालय वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. अध्यक्षीय भाषणात विश्रांती ताई तायडे यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या वडिलांकडून वाचन लेखन व नीती मूल्याचे शिक्षण मिळालं त्या दयाळू व बुद्धिमान होत. गुणवंत विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर वाचनालयातील अभ्यासिकेचा लाभ घेणे काळाची गरज आहे. कार्यक्रमाला भगवान काळदाते, शिवाजी ठाकरे ,सोनू गवई ,संकेत इंगळे,रोहित मोरे, सुभाष वानखडे ,प्रमोद दामोदर, अखिल दामोदर, ममता दामोदर, राखी निकाळे, दशरथ गवई, आशिष उमाळे , प्रमोद शेषराव दामोदर,यश तायडे व वाचनालयाचे वाचक सभासद ग्रंथ प्रेमी सर्व गुणवंत विद्यार्थी तथा परीक्षा स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे विद्यार्थी यांची आवर्जून उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मिलिंद भाऊ तायडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल विरेंद्र राजेंद्र तायडे यांनी केले.




