Home Breaking News पिकलं जाभुळं कुणी तोडु नका….. माझ्या झाडावरती चढु नका….

पिकलं जाभुळं कुणी तोडु नका….. माझ्या झाडावरती चढु नका….

👉 मधुमेहावर अंत्यत गुणकारी असलेले गूणकारी वनस्पती

मारोती अक्कलवाड पा.सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 02 जुन 2023

” पिकलं जाभुळं कुणी तोडु नका माझ्या झाडावरती चढु नका” हि ठसकेबाज लावणी ऐकल्यावर जांभुळ या फळाची आठवण तर येणारच…. यावर्षी अवकाळी पाऊस चांगला पडल्याने फळधारणा चांगली झाली आहे. हिरव्यागार फांदीवर काळे… काळे जांभुळ खायायला आणि पाहायला सध्या मिळत आहेत.
मधुमेहावर अंत्यत गुणकारी समजले जांभुळाचे बि सुकवुन भुकटी तयार करून अंनशापोटी चमचाभर खाल्ल्यास शुगर ( मधुमेह) हे नियंत्रणात राहते. असे वयोवृद्ध मंडळी आजही आवर्जून सांगतात. त्याचबरोबर या झाडाचे फांद्या लग्नसोहळयातील मांडवाला वापरण्याची जुनी पद्धत आजतागायत कायम आहे.

Previous articleपिंगलवाड सरांचे कार्य असेही कौतुकास्पद  वाचा
Next articleपत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा..