Home Breaking News आ. जवळगावकरांच्या प्रयत्नामुळे कारला येथील शेतकऱ्यांना दोन दिवसात गावठाण डिपी मिळाला…

आ. जवळगावकरांच्या प्रयत्नामुळे कारला येथील शेतकऱ्यांना दोन दिवसात गावठाण डिपी मिळाला…

अंगद सुरेश हिमायतनगर प्रतिनिधी/ कारला येथील गावठाण डिपी आठ दिवसापूर्वी जळाला होता. शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी देण्याच्या ऐन मोसमवर मोटारी बंद झाल्या होत्या. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी तात्काळ अवघ्या दोन दिवसात डि. पी. मिळवून दिला आ. जवळगावकर यांच्या कार्य तत्परतेचे कौतुक केले आहे
. हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील गावठाण डि.पी आठ दिवसापासून जास्तीचा लोड होऊ लागल्याने अचानक जळाला होता. शेतकऱ्यांनी महावितरण चे कनिष्ठ अभियंता कळसकर, वायरमन दिपक वाघमारे यांना भेटून डि. पी. उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आ. माधवराव पाटील जवळगावकर यांना डि. पी. तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली असता आ. जवळगावकर यांनी भोकर येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता मोरे यांना बोलून दोन दिवसात डि पी. उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या.त्यानंतर शुक्रवारी डि. पी मिळाला आहे. महावितरण चे कनिष्ठ अभियंता कळसकर, वायरमन दिपक वाघमारे यांनी कारला येथील शेतकऱ्यांना मदत करून डि. पी. गावापर्यंत पोहचवला आणि तात्काळ सुरू करून दिला आहे. शेतकऱ्यांनी आ. माधवराव पाटील जवळगावकर व अभियंता कळसकर, वाघमारे यांच्या कामाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पंपाचे विज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे कारला येथील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची डि. पी. बाबत अडचण भासु देणार नाही असेही अभियंता कळसकर म्हणाले यावेळी कारला येथील शेतकरी डॉ गफार, अशोक अचमवाड,
अगंद सुरोशे, संजय मोरे,बाळू पाटील, केशव रासमवाड, कोकरे, गणेश नरवाडे, गजानन मोरे, अक्षय मोरे, पांडुरंग यमजलवाड, राजू रासमवाड,व्यंकटराव मोरे, यांच्यासह शेतकऱ्यांनी वेळेवर डि. पी. मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे

Previous articleजलंब प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आजपासून साखळी उपोषणास सूरुवात
Next articleलॉयन्स क्लब संस्कृती खामगाव तर्फे मुकबधीर विद्यालयात दिवाळी साजरी..