Home Breaking News मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हिमायतनगर तालुक्यातील कारला फाटा व वडगाव फाटा...

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हिमायतनगर तालुक्यातील कारला फाटा व वडगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन

👉🏻 उद्या हिमायतनगर शहर बंदची हाक..

अंगद सुरोशे
हिमायतनगर प्रतिनिधी /-मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या आठ दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे पप्राणांतिक उपोषण सुरू आहे त्यांची तब्येत खालावल्याने मराठा समाजाने हिमायतनगर तालुक्यातील वडगाव फाटा व कारला फाटा येथे आज दि 31 ऑक्टोंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करून दोन ते तीन तास चक्काजाम करून वाहनांची अडवणूक केली

या बाबत सविस्तर वृत्त असे की संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी साखळी उपोषण करून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत हिमायतनगर तालुक्यातील जवळपास 25 गावांमध्ये नेत्यांना गावबंदी घातलेली आहे तर अनेक पदाधिकारी हे आपल्या पदाचा राजीनामा देऊन मराठा बांधवांच्या साखळी उपोषणास पाठिंबा देत आहेत आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी हिमायतनगर तालुक्यातील वडगाव फाटा व कारला फाटा येथे सकाळी अकरा वाजता सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यामध्ये भोकर ते किनवट जाणाऱ्या गाड्यांची आडवणूक करण्यात आली यामध्ये हजारोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरल्याने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली असल्याचे पाहायला मिळाले..

Previous articleॲड. प्रकाश आंबेडकरांचे मनोज जरांगेंना पत्र!
Next articleशेगाव अल्पसंख्यांक विभागाकडुन मा.नाना भाऊ पटोले यांचा सत्कार.