Home Breaking News शेगाव अल्पसंख्यांक विभागाकडुन मा.नाना भाऊ पटोले यांचा सत्कार.

शेगाव अल्पसंख्यांक विभागाकडुन मा.नाना भाऊ पटोले यांचा सत्कार.

शितल शेगोकार अँकर भूमीराजा प्रतिनिधी

शेगांव. मा.आ.नाना भाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी हे अकोला जिल्हयात काँग्रेस ची आढावा बैठकीनिमित्त आले होते. त्यावेळी आ. नाना भाऊ पटोले रात्री शेगांव येथील आनंद सागर विसावा येथे मुक्कामी होते. तेव्हा डॉ. असलम खान प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग यांनी अल्पसंख्यांक विभागा तर्फे मा. आ. नाना भाऊ पटोले यांचा सत्कार केले. आणि त्यांचे सोबत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व अल्पसंख्यांक समाजा चे समस्या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.मा.आ.नाना भाऊ पटोले यांनी सांगितले की जोमाने कामाला लागा. या वेळी विजय काटोले तालुका अध्यक्ष काँग्रेस. विजय वानखेडे.ज्ञानेशवर शेजोळे. शेख अमीन जमदार तालुका अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक विभाग.आसीफ खान गुड्डू. विजय गुरव. डॉ असलम खान यांनी सर्व पक्ष श्रेष्ठीं. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे महासचिव तथा खासदार मा.मुकुलजी वासनिक साहेब. खासदार इमरान प्रतापगढी अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्यांक. मा. आ. नाना भाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी. मा.आ डॉ.वजाहत मिर्झा प्रदेशाध्यक्ष कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभाग. मोहम्मद अहेमद खान प्रभारी महाराष्ट्र काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग. मा.आ.राहुल भाऊ बोंद्रे जिल्हाध्यक्ष बुलढाणा काँग्रेस. डॉ. सौ. स्वाती ताई वाकेकर प्रदेश सचिव तथा पक्ष नेत्या जलगांव जामोद विधानसभा. प्रदेश सचिव रामविजय जी बुरूंगले.खामगाव विधानसभा मतदारसंघा चे पक्षनेते मा.ज्ञानेश्वर दादा पाटील. जिल्ह्यातील सर्व जेष्ठ व सहकार्य करणाऱ्या मंडळी चे आभार व्यक्त केले. माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्ताला पक्षाने जे मोठी जबाबदारी दिली आहे. त्या मी तन मन धनाने पार पाडेल. येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व आगामी येणाऱ्या सर्व निवडणुका मध्ये काँग्रेस चे उमेदवार निवडून येणया साठी पुर्ण ताकदीने पक्षा ची सेवा करणार. असे डॉ. असलम खान प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग यांनी सांगितले.

Previous articleमनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हिमायतनगर तालुक्यातील कारला फाटा व वडगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन
Next articleवंचित बहुजन आघाडीच्या ९ प्रवक्त्या मध्ये प्रवक्ते पदी आद.डॉ.धैर्यवर्धन पुंडकर आणि आद.राजेंद्र भाऊ पातोडे ह्यांची वर्णी.