भुमीराजा न्यूज तालुका प्रतिनिधी /संतोष मोरे
शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यास बाजूला ठेवून उन्हात भरावे लागते पाणी*
बाळापूर:- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे मागील काही महिन्यांपासून पाणी टंचाई सुरू झाली तरी याकडे बाळापूर येथील कोणते अधिकारी लक्ष देत नसल्याचे समजते. शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यास बाजूला ठेवून उन्हात भरावे लागते पाणी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याकडे सुध्दा अकोला जिल्हाधिकारी मॅडम यांनी लक्ष देण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.लोहारा गावातील मन नदी वरती कवठा गावात प्रशासनाने कोटी रुपये खर्च करून धरण बांधले परंतु मागील चार वर्षापासून या धरणात पाणी अडविलेले नाही. त्यामुळे हे धरण प्रशासनाने कोटी रुपये खर्च फक्त शोभेसाठी खर्च केला का अशा प्रश्न येथील नागरिकांना करित आहे. सध्या उन्हाळा चालू असून गरीब नागरिकांच्या हाताला काम नाही.त्यात ही पाणी टंचाई २०० लिटर पाण्यासाठी मोजावे लागतात २०० रुपये हाताला काम नसल्यामुळे येथील नागरिकांनी जीवन कसे जगावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पैशाने पाणी विकत घ्यावे कि घरात खायला आणावें हि मोठी चिंता येथील नागरिकांना पडला आहे. येथील ग्रामपंचायत हे सलाई वरती चालू आहे. लोहारा ग्रामपंचायतला माय,बापच नाही येथील कारभार रामभरोसे चालू कोणाला गरीब जनतेचे काहीच देणेघेणे नाही तरी याकडे अकोला जिल्हाचे जिल्हाअधिकारी मॅडम यांनी लक्ष देऊन येथील गरीब जनतेचे पाणी टंचाई प्रश्न लवकरात लवकर सोडवावे असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.



