Home Breaking News पांगरा गाव विकास कामात सदा अग्रेसर!

पांगरा गाव विकास कामात सदा अग्रेसर!

परभणी, (आनंद ढोणे) :– जिल्ह्याच्या पूर्णा तालूक्यातील पांगरा लासीना हे सर्वांगीण विकास कामात सदा अग्रेसर ठरत असून येथील ग्रामपंचायतच्या सरपंच सौ गिरजाबाई महादूबुवा गिरी व त्यांचे सुपूत्र राम उर्फ राजू महाराज गिरी,उपसरपंच नामदेवराव ढोणे,मार्गदर्शक तथा माजी सरपंच उत्तमराव शेषरावजी ढोणे पाटील, ग्रामसेवक खूपसे तसेच सर्व सदस्य आणि विकासकामी सदैव मदत करणारे गावकरी यांच्या सहकार्याने गावात विविध ग्रामसूधार योजनेच्या निधीतून विकास कामे झाली असून अजूनही चालूच असल्यामुळे पांगरा गाव विकास कामात तालूक्यात अव्वल ठरत आहे.
————–
पांगरा लासीना हे सूमारे अडीच ते तीन हजार लोकसंख्या असलेलं गाव असून येथील ग्रामपंचायतच्या वतीने गावात प्रत्येक नागरीकांच्या घरी शौचालय बांधून दिले आहे. तसेच गावात पक्के सिमेंट रस्ते,काही ईच्छूक शेतक-यासाठी रोहयो अंतर्गत सिंचन विहीरी,गावाशेजारील नदीवर सिमेंट बंधारे,पाणीपुरवठा करण्यासाठी दोन मोठ्या विहरी,सुसज्ज उप आरोग्य केंद्र,शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय असलेली जिल्हा परिषद शाळा,हिंदू व मागासवर्गीय बांधवांसाठी व्यवस्थित बांधकामनिहाय स्मशानभूमी,अद्यावत ग्रामपंचायत कार्यालय शिवाय मातोश्री पाणंद मुक्ती योजनेतून एक लांब शेत रस्ता,रोहयो अंतर्गतच शेतक-यासाठी फळबाग योजना,लहान मूलांच्या शिक्षणासाठी चांगल्या अंगणवाड्या,स्वस्त धान्य दूकानातून शासकीय नियमाप्रमाणे लाभार्थ्यांना नियमित धान्य वाटप,रमाई घरकूले,सर्वसाधारण नागरीकासाठी प्रधानमंत्री योजनेतून घरकूले या प्रमाणे विविध विकास कामे सदरील ग्रामपंचायत करीत असून या पैकी काही कामे पूर्वीच करण्यात आली असून उर्वरित चालू आहेत. यापूढेही उर्वरित आवश्यक ती ग्राम विकास कामे टप्याटप्याने केली जाणार आहेत.सर्व घटकातील नागरीक व शेतक-यांना या ग्रामसूधार योजनेच्या कामामुळे फायदा होत असल्याचे असंख्य नागरीक लाभार्थी बोलून दाखवीत आहेत. येथील ग्रामपंचायतच्या पदाधिकारी टिमकडून कोणाचाही भेदभाव केला जात नाही.किंवा हा अमूक पार्टीचा तो त्या अमूक पार्टीचा? असे म्हणून कधीच दुजाभाव न करता प्रत्येक नागरीक व शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू समजून कामे केली जात असल्याने हे गाव येत्या पुढील काही दिवसात विकासाचे माॅडेल म्हणून पूढे येणार असल्याचे दिसून येत आहे.

Previous article*हिंदी माध्यमिक विद्यालयात भव्य पालक मेळावा संपन्न*
Next articleलाखो भाविकांचे श्रध्दास्थान माहूरची रेणूका देवी!