Home Breaking News राज्य नाट्य स्पर्धा : नाशिक उद्घघाटन समारंभ उत्सवात संपन्न

राज्य नाट्य स्पर्धा : नाशिक उद्घघाटन समारंभ उत्सवात संपन्न

हेमंत शिंदे -: नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा  मो. नंबर – 8983319070

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालय आयोजित 61 व्या राज्य नाट्य स्पर्धाचा नाशिक मध्ये गुरुवारी संध्याकाळी उद्धघाटन हो वुन प. सा. नाट्यगृहात शुभारंभ झाला.
या उद्धघाटन प्रसंगी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फड़के, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवी कदम,नाट्य परिषदे चे प्रमुख कार्यवाह सुनिल ढगे,स्पर्धा परीक्षक मंगेश नेहरे, विश्वास पांगारकर, किरण अडलमोले, स्पर्धा समन्वयक राजेश जाधव, उपसमन्वयक मीना वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी प्रा. रवी कदम म्हणाले की, राज्याला देशाची सांस्कृतिक राजधानी करणे ही आपली जबाबदारी आहे. अशा स्पर्धातूनच ते काम होत असते. राज्य नाट्य मध्ये अत्यंत प्रभावी काम करणा-याला नाट्य परिषदे तर्फे पुढील वर्षापासुन रंगकर्मी योद्धा पुरस्कार देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
या नंतर लेख़क विजय तेंडु लकर लिखित, राजेश शर्मा दिग्दर्शित ‘ विठ्ठला ‘ हे नाटक सादर होवुन राज्य नाट्य स्पर्धाला प्रारंभ झाला.

Previous articleभारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचा मेळावा निफाड़ येथे उत्साहात संपन्न
Next articleराहुलजी गांधी, सोबत प्रकाश तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश भारत जोडो सतत पदयात्रेत अभियानदरम्यान महत्वपुर्ण बाबीवर चर्चा करतांना,