Home Breaking News स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी नंतरही पाहुनमारी गांवाला पक्का रस्ताच नाही.

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी नंतरही पाहुनमारी गांवाला पक्का रस्ताच नाही.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 28 जुलै 2023

गेल्याच वर्षी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. परंतु आरोग्य यंत्रणा, रस्ता, यांसारख्या सुविधा पाहुणमारी गावाला मिळाल्या नाहीत. एका वयोवृद्ध महिलेला रुग्णालयात चक्क पाठीवर बसुन न्यावे लागले. हि शोकांतिका आहे.

” खेडे हे देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. खेड्यातील अंधार नाहीसा केल्याशिवाय, देश प्रकाशित झालेला कसा दिसणार.
…….. राष्ट्रपिता महात्मा गांधी

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण त्यासोबत आरोग्य, शिक्षण, चांगला रस्ता या देखील तेवढ्याच अतिमहत्त्वाच्या समस्या आहेत. म्हणुन ग्रामीण भागात मुलभुत सोईसुविधा मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तळमळ दाखविली पाहिजे. तरच ग्रामीण भागातील नागरीकांचा सर्वांगिण विकास होईल.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ग्रामीण भागाचा विकास व्हावा, अशा तळमळीने पुढील शंभर वर्ष ग्रामीण भागात काय? काय?समस्या जाणवणार यांची त्यांना कदाचित प्रचिती असावी. म्हणुन राष्ट्राची प्रगती साधण्यासाठी त्यांनी खेड्यांच्या विकासाची दिशा दाखविली असावी. ती आजतागायत तंतोतंत लागु पडते आहे. गांव छोटे असो की, मोठे तिथे आपली माणसं राहतात. याची जाण ठेवून सर्वसमावेशक प्रत्येक खेड्यांचा विकास आजच्या लोकप्रतिनिधींनी जरुर करायला हवा. अशी मागणी होत आहे.

Previous articleआज जागतिक निसर्ग संवर्धन दिन निमित्ताने शेगाव विश्वनाथनगर जिल्हा बुलढाणा येथे संपन्न
Next articleमहाराष्ट्र पोलीस भिडेच्या दिमतीला, देशद्रोही वक्तव्य करणाऱ्या भिडेंच्या कार्यक्रमांसाठी युवा आघाडीचे कार्यकर्त्यांना नोटीस !