Home Breaking News अहिल्यादेवी होळकर सभागृहात समाजकंटकांकडून तोडफोड़

अहिल्यादेवी होळकर सभागृहात समाजकंटकांकडून तोडफोड़

नागरिकांच्या वतीने कठोर कार्यवा ही करण्याची पोलीसांकड़े मागणी

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा

नाशिक सिडको शिवारातील इंद्रानगरी येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात अनोळखी समाजकंटकांनी तोड़फोड़ करुन सभागृहाचे अतोनात नुकसान केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. समाजकंटकांनी सभागृहातील तीन इलेक्ट्रिक बोर्ड फोडून सामाजिक सभागृहातच मध्यपान करुन दारूच्या बाटल्या फोडल्या. तसेच सभागृहातील वस्तुची मोठ्या प्रमाणात नासधुस केली.
स्थानिक नागरिकांना हा प्रकार समजताच त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत अंबड पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. त्याची तत्काळ दखल घेउन पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी घटनास्थलीं पाहणी करीत या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात येवून कठोर कार्यवाहीचे आश्वासन स्थानिकांना दिले.

Previous articleशहरातील कासारखेड भागात चोरट्यांचा धुमाकुळ
Next articleस्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त हिमायतनगर काँग्रेसतर्फे काढण्यात आली भव्य पदयात्रा रॅली …