Home Breaking News स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त हिमायतनगर काँग्रेसतर्फे काढण्यात आली भव्य पदयात्रा रॅली …

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त हिमायतनगर काँग्रेसतर्फे काढण्यात आली भव्य पदयात्रा रॅली …

👉🏻 तिरंगा गौरव पदयात्रा रॅलीमध्ये आमदार जळगावकरांनी प्रत्यक्ष दहा किलोमीटर पायी प्रवास करून जनतेला दिले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा……..

भूमीराजा न्यूज हिमायतनगर शहर प्रतिनिधी,
कृष्णा राठोड- ९१४५०४३३८१

हिमायतनगर /-
हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी आज दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तिरंगा गौरव पदयात्रा चे आयोजन केले होते.
या तिरंगा गौरव पदयात्रेची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालय सरसम येथील क्रांतिसूर्य बिरसा मुंडा व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून नंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या गौरव पदयात्रेला सुरुवात केली. या पदयात्रेत आमदार माधवराव पाटील जवळगावकरांनी दहा किलोमीटर पायी प्रवास करून तालुक्यातील नागरिकांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. या गौरव पद यात्रेमध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या तिरंगा पदयात्रा रॅलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने हर घर तिरंगा मोहिमेला अधिक गती मिळाली असल्याचे दिसून आले आहे.
या रॅलीमध्ये महात्मा गांधी की जय लालबहादूर शास्त्री की जय अशा थोर महापुरुषांच्या घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट हिमायतनगर पर्यंत आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
सरसम ग्रामपंचायत येथे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेली वेता जाणून घेतली.
आज देशामध्ये 75 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत असतानादेखील यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आज अश्रू आहेत.
अश्रू पुसण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाने १३६०० रुपयांऐवजी 50 हजार रुपये हेक्टर अनुदान शासनाने शेतकऱ्यांना द्यावेत, अशी शिफारस आम्ही येणाऱ्या हिवाळी अधिवेशन मध्ये मांडणार आहोत, असे जळगावकरांनी पदयात्रा रॅलीतील उपस्थित शेतकऱ्याला सांगितले आहे. शासनाने असे 50 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना दिल्यास खऱ्या अर्थाने या वर्षीचा अमृतमहोत्सव साजरा झाला असल्याचे वाटेल .
या गौरव पदयात्री मध्ये अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला नागरिकांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन जोरदार घोषणा दिल्या रॅलीमध्ये भारत माता की जय हर घर तिरंगा असे नारे देत तिरंगा ध्वज हातामध्ये घेऊन राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सायप्रस इंग्लिश स्कूल येथे थांबून येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी या पदयात्रेचे स्वागत केले.
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मोहम्मदिया दारू येथील मौलानानी सर्व पदयात्री ना मोफत पाणी चहाचे वाटप केले व नंतर शहरातील मुख्य रस्त्याने फिरून जनजागृती करण्यात आली. सदर रॅलीमध्ये काँग्रेसचे अनेक पदाधिकारी नगरसेवक सहभागी झाले होते हर घर तिरंगा मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले आहे.
यावेळी हदगाव हिमायतनगर विधानसभा पक्ष निरीक्षक संजय लहानकर,हदगाव तालुका अध्यक्ष आनंदराव भंडारे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष दादा राठोड शहराध्यक्ष संजय माने,मजर मौलाना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक शेठ, माजी जिल्हा परिषद सदस्य समद खान प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे सर्च नगरीचे उपसरपंच अतुल वानखेडे, प्रल्हाद पाटील तेंभूर्णीकर जनार्दन ताडे वाढ श्याम जक्कल वाढ गोविंद बंडेवार श्रीदत्त पाटील, हिमायतनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी .डी . भुसनर, पत्रकार मंडळी यासह हदगाव -हिमायतनगर विधानसभा परिसरातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleअहिल्यादेवी होळकर सभागृहात समाजकंटकांकडून तोडफोड़
Next articleमराठा आरक्षणाचे नेते विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाने मराठवाड्यावर पसरली शोककळा!