Home Breaking News बियाणे, खते, किटकनाशके यांच्या किमती वाढल्या; पण नुकसानीचे निकष नाही बदलले…

बियाणे, खते, किटकनाशके यांच्या किमती वाढल्या; पण नुकसानीचे निकष नाही बदलले…

@ कृषि वार्तापत्र.@

मारोती अक्कलवाड पा.सवनेकर.              जिल्हा संपादक नांदेड.                              दिनांक – 05 आगष्ट 2022

शेतकऱ्यांच्या शेतातील कृषि निविष्ठांची भरमसाठ वाढ झाली आहे. शेतातील पिकांचे नुकसान झाले तर संरक्षण कवच म्हणुन पिकविमा उतरविण्यासाठी योजनेची अंमलबजावणी केली.
परंतु बि- बियाणे, खते, किटकनाशके यांच्या किंमती गगनाला भिडल्या. त्याच दृष्टिकोनातून शेतीचे पावसामुळे, पावसाअभावी जर नुकसान झाले तर नुकसान भरपाई म्हणून जी आजतागायत रक्कम किंवा अनुदान मिळते. हे कृषि निविष्ठा च्या बदल्यात खुपच अत्यल्प आहे. त्यामुळे हि जी रक्कम किंवा अनुदान शेतकऱ्यांना मिळत. त्यात सरकारने वाढ करणे गरजेचे आहे. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सरकारने आपल्या मार्गदर्शकेमध्ये, गाईडलाईन मध्ये सुधारणा करून, शेतकऱ्यांना आर्थिक अनुदानात पण वाढ करावी अशी मागणी होत आहे.
यावर्षीची शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची परिस्थिती पाहून, जिथे गेल्या वर्षी एकरला जो काही 10 पोते उत्पादन मिळाले आहे. त्याच एकरमध्ये यावर्षी 2 पोते माल निघणार की नाही. हे येणारा काळच ठरवेल. त्यामध्ये मजुरांचा खर्च आलाच, आंतरमशागतीची कामे करण्यासाठी खर्च, खते टाकण्याचा खर्च, किटकनाशके फवारणी करतांनाचा खर्च. एकंदरीत हा सर्व खर्च शेतकऱ्यांना करुन उत्पादन मिळत नाही. कारण पावसामुळे पिकांची परिस्थिती नाजुक आहे.
म्हणुन काही कृषिविभागातील तज्ञासोबत चर्चा करतांना हि अनुदान वाढ किंवा नुकसान भरपाईचा मुद्दा चर्चेचा ठरला. म्हणुन सरकारने यामध्ये जुने नुकसानीचे दरात बदल करुन, शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देवुन, बळीराजाला सक्षम करणे हा पर्याय चांगला आहे.

Previous articleसततच्या पावसामुळे पिकांची अपेक्षित वाढ खुंटली.
Next articleस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती. 👉भावी उमेदवारच्या आशा आकांक्षेवर फिरले पाणी……