Home Breaking News पिंगलवाड सरांचे कार्य असेही कौतुकास्पद  वाचा

पिंगलवाड सरांचे कार्य असेही कौतुकास्पद  वाचा

👉 सेवानिवृत्ती समारोप प्रसंगी मा. अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांचे गौरवोद्गार!

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- २ जुन २०२३

श्रीसंत गाडगेबाबा महाराज आदिवासी आश्रम शाळा सिताखांडी येथील मुख्याध्यापक केशवराव बापुजी पिंगलवाड सर यांचा सेवानिवृत्ती समारोप ३१ मे रोजी संपन्न झाला. केशवराव पिंगलवाड सर सौ पिंगलवाड मॅडम यांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन आदी मान्यवरांनी सत्कार केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात नांदेड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार म्हणाले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सिताखांडी येथील गाडगेबाबा महाराज आदिवासी आश्रम शाळा केशवराव पिंगलवाड सर यांनी ३६ वर्ष ६ महिने १४ दिवस आपली सेवा पुर्ण केली आहे.

आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक कसा असावा हे पिंगलवाड सर यांच्यामध्ये मला दिसतो आहे. अध्यापनाचे काम करत असताना शाळेवर शिक्षकांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. अशाही परिस्थितीत पिंगलवाडसर यांनी अगदी ठामपणे मुख्याध्यापक म्हणून आपली जबाबदारी पार पाडली. अतिशय संयमाने माध्यमिक विद्यालयात हे आपले कुटुंब आहे. अशाप्रकारे समजत तन मनाने अध्यापनाचे काम केले आहे. मी नांदेड जिल्हा परिषदचा अध्यक्ष असतांना मला शिक्षकांना कोणकोणत्या परीस्थितीला तोंड द्यावे लागते हे माहीत आहे. असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या संचालीका सौ ज्योतीताई ढाणकीकर, कृ.उ.बा. हिमायतनगरचे संचालक परमेश्वर गोपतवाड, चंपतराव मेंडके साहेब, जिल्हा अध्यक्ष गजानन तिप्पनवार, संचालक सुभाष पाटील किन्हाळकर, उपसभापती बालाजी पाटील शामणवाड, शासकीय गुत्तेदार गोविंद उल्लेवाड, अॅड कदम, युवा उद्योजक शामअण्णा रेड्डी, राजेश्वर अनगुलवार, सुबनवाड सर, सिताखांडी येथील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षीका, समाज बांधव, पाहुणे, मित्र, आजी माजी विद्यार्थी, महिला आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मेंडके काका, गजानन तिप्पनवार, गोविंद उल्लेवाड, पत्रकार परमेश्वर गोपतवाड, सौ. पिंगलवाड मॅडम, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत पिंगलवाड, यमलवाड सर, सौ प्रिया लक्ष्मण गोपतवाड, संदिप पिंगलवाड आदींनी परिश्रम घेतले आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर यांनी केले.

Previous articleनाशिक गोदा घाट रामकुंड पंचवटी अहिल्या जन्मोत्सव सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा..
Next articleपिकलं जाभुळं कुणी तोडु नका….. माझ्या झाडावरती चढु नका….