Home Breaking News हिमायतनगर येथे राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाची अधिवेशन संदर्भात आढावा बैठक संपन्न 

हिमायतनगर येथे राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाची अधिवेशन संदर्भात आढावा बैठक संपन्न 

हिमायतनगर (अंगद सुरोशे ) – महाराष्ट्रच नव्हे इथे बाहेर अनेक राज्यात ग्रामीण भागातील नव्या व जुन्या सर्वच पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी व संरक्षणासाठी एक मजबूत संघटन म्हणजे राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघ होय.या संघटनेची आढावा बैठक दि ३ जुलै रोजी शासकीय विश्रामगृह हिमायतनगर येथे पार पडली. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार हे उपस्थित होते.

 

याविषयी सविस्तर वृत्त असे कि राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघ एका वर्षातच आपल्या कामामुळे नावालौकीकास आला व जवळपास बावीस हजार सभासद पूर्ण झाले आहेत. या सर्वांच्या भेटीगाटी व मार्गदर्शन म्हणून या संघटनेचे ऑगस्ट मध्ये पहिले अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या संदर्भात ही बैठक पार पडली. यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार सर म्हणाले कि दि ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पहिले अधिवेशन महागाव येथे आयोजित करण्यात आले आहे. यासाठी सर्वच पदाधिकारी यांनी आग्रहाणे उपस्थित राहावे.

तसेच उपस्थित पत्रकार बांधवांना गणेश कचकूलवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व पत्रकारांनी आपल्या समस्या मांडल्या व यावर सकारात्मक चर्चा घडून आली. यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष विजय वाठोरे सरसमकर,जिल्हा सल्लागार गंगाधर गायकवाड,उपाध्यक्ष विष्णू जाधव, संघटक दाऊ गाडगेवाड, सचिव राम चिंतलवाड,युवक आघाडी तालुका उपाध्यक्ष लिंगोजी कदम,युवक आघाडी चे सचिव प्रभू कदम,शहर उपाध्यक्ष अजिम हिंदुस्थानी, सदस्य अंगद सुरोशे,मोजमील शेख यांच्यासह आदीउपस्थित होते.

Previous articleसिन्नर तालुक्यातील शहा येथे पुरपाणी योजनेच्या कामात गैर व्यवहार
Next articleकपाशीतील आतंरमशागतीला आला वेग!