Home Breaking News येवला येथील तहसीलदाराची शेतकऱ्या संदर्भात मनमानी कारभार

येवला येथील तहसीलदाराची शेतकऱ्या संदर्भात मनमानी कारभार

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

येवला तालुक्यातील दहेगाव पाटोदा शिव रस्ता संदर्भात अनेक शेतकरी बाबुराव कारभारी काळे एकनाथ नामदेव काळे अंबादास नामदेव काळे नानाभाऊ नामदेव काळे पुष्पा मोठ्या भाऊ व्हलगडे रा. पिंपळगाव लेप येथील शेतकरी शिव रस्ता मोकळा करून देण्यासंदर्भात मागील दोन-तीन वर्षापासून मागणी करत आहेत परंतु राजकीय दबाव पोटी माननीय तहसीलदार साहेब त्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहेत शेतकऱ्यांना शेतीचा मालची दळणवळण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे जवळ 300 मीटर अंतरावरती डांबरीकरण रस्ता आहे परंतु सात आठ किलोमीटर अंतरावरून फिरून यावे लागते त्या त्या शेतकऱ्यांना शेजारी गुंड प्रवृत्तीचे लोक त्रास देतात तरीही शांत राहतात गेले दोन-तीन वर्षापासून बैठका घेऊन पत्रव्यवहार करून कुठल्याही प्रकारचा तोडगा यावर निघालेला नाही आणि प्रशासन कुठेही लक्ष देत नाही या कुटूंबाची मागणी मान्य करण्यासाठी शासन दरबारी गेली दोन-तीन वर्ष चक्र मारून ते शेतकरी थकून गेले आहेत परंतु तहसीलदार साहेबांना त्यांची कुठल्याही प्रकारे अडचण दूर करत नाही शासन परिपत्रक असून त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की शिव पानंद रस्ते व ज्या शेतकऱ्यांना येणे जाण्यासाठी रस्ते नाहीत त्या ठिकाणी तहसीलदार यांनी त्यांच्या अधिकारात रस्ते मोकळे करून देण्याचे स्पष्टपणे नमूद केले असल्यावर सुद्धा संबंधित तहसीलदार डोळे झाक करत आहे.
उदाहरणार्थ अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांनी याबाबत एका वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या उदाहरण हे बोलकं आहे. प्रशासनाचा बे जबाबदार कारभार आहे

Previous articleश्री संत तुळसाबाई यात्रा महोत्सव पिंपळखुटा
Next article*रुग्ण हक्क परिषद आणि युनिव्हर्सल हॉस्पिटल, पुणे यांचे एकत्रित काम सुरु – उमेश चव्हाण*