Home Breaking News मौजे दाबदरी भोडणी तांडा येथील दारूचे विरोधात महिलेचा एल्गार…!

मौजे दाबदरी भोडणी तांडा येथील दारूचे विरोधात महिलेचा एल्गार…!

जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 06 जानेवारी 2023

हिमायतनगर तालुक्यातील मौजे दाबदरी भोडणी तांडा येथील महिलांनी गावातील अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारु बंद व्हावी. यासाठी गावातील महिलांनी हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे अर्ज दाखल केला आहे. गावातील अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत. गावठी हातभट्टीची दारु पिऊन भाडंण तंटे होत आहेत. दारू पिऊन भाडंण करत असलेल्या लोकांकडून महिलांना अतिशय मानसीक त्रास सहन करावा लागत आहे. दारूच्या व्यसनामुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी होत आहे. कमी वयातच दारुचे व्यसन लागत असल्याने अल्पवयातच मृत्यू होत आहे.
यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्यासाठी गावठी हातभट्टीची दारु विनापरवाना विकणा-यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. असेही अर्जात नमूद केले आहे. या अर्जावर अनेक महिलांच्या सह्या आहेत.

Previous articleगोदा संवर्धन अभियान ” अंतर्गत व्हि. एन. नाईक शिक्षण संस्थेची नूतन मराठी शाळा आज भरली गोदाकाठावर
Next articleपहिल्या राष्ट्रीय प्रवासी कवी संमेलनात गोवा राज्यात कवयित्री शितल शेगोकार यांचा सन्मान सोहळा…..