Home Breaking News डॉ शेख चांद यांना राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार

डॉ शेख चांद यांना राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार

संतोष मोरे बाळापूर तालुका प्रतिनिधी 
ग्रामीण भागातील हरहुन्नरी कलाकार डॉ शेख चाँद यांना राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला असून त्याबाबत मित्रमंडळी कडून अभिनंदन करण्यात येत आहे. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील डॉ शेख चाँद मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शक.लेखक , अभिनय. गीतकार ,संपादकीय , सामाजिक कार्य, सांस्कृतिक क्षेत्रात व पत्रकारिता क्षेत्रात तसेच शैक्षणिक क्षेत्रात, बहुमूल्य योगदानाबद्दल तसेच हरहुन्नरी कलाकार म्हणून जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात परिचित आहेत यासोबतच निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. कुठल्याही प्रकारचा वारसा नसताना सुद्धा इच्छा शक्ती च्या जोरावर डॉ शेख चाँद यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत नावलौकिक प्राप्त केले आहे.

त्यांच्या याच उल्लेखनीय कामगिरी ची दखल घेऊन 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पुणे येथील विजया मिडिया व सायबर गुन्हे यांच्या वतीने दिनांक 17 मे रोजी पुणे येथे प्रमुख अतिथी धरमचंद लोढा , सौ.भारतीताई तुपे, अनंतजी घरत, अँड विजय लिंगरे, सुनील गोरे, आदी आमंत्रित प्रमुख गणमान्य मान्यवरांच्या हस्ते डॉ शेख चाँद यांना राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ शेख चाँद यांना राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाल्या मुळे जिल्ह्यातील मित्रमंडळी, विविध क्षेत्रातील मंडळी, नातेवाईक यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleबाळापूर नगरीत बौध्दधम्म परिषद संपन्न.