Home Breaking News गावात नागरी सुविधांचा अभाव नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

गावात नागरी सुविधांचा अभाव नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

निवडणुकीच्या कालावधीत मिळते आश्वासनाची खैरात

भूमीराजा न्यूज प्रतिनिधी/ संतोष मोरे

बाळापूर :- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील दुर्गम भागातील अंदाजे सातशे लोकसंख्या असलेल्या बल्हाडी गावात नागरी सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र निर्माण झाले असून प्रशासन तसेच लोकप्रतिनिधीची अकार्यक्षमता असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. तर निवडणुकीच्या कालावधीत वारेमाप आश्वासनाची खैरात वाटली जात असल्याचे सांगितले जात आहे .गावात नागरी समस्याचा अभाव असल्यामुळे नागरिकांच्या कडून जिल्हाधिकारी तसेच संबंधीतांना बल्हाडी येथील नागरिकांच्या वतीने वेळोवेळी निवेदन सादर करण्यात आलेली आहेत. ग्राम पंचायत चिंचोली गणु गट ग्राम पंचायत अंतर्गत बल्हाडी गावाचा कारभार पहिला जातो परंतु शासन स्तरावरून नागरिकांच्या नागरी सुविधा उपलब्ध करण्या साठी मोठ्या प्रमाणात विविध योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला जातो. त्या अनुषंगाने इतर गावातच्या तुलनेत नागरी सुविधा उपलब्ध निदर्शनास येत नाहीत. सध्याच्या परिस्थितीत गावातील घरातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट आभावी घाण पाणी रस्त्यावर वाहताना दिसते. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होवून आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच गावातील रस्त्यांची प्रचंड प्रमाणात दुरवस्था असुन पावसाळी दिवसात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याचे चित्र निर्माण होत असते. त्याच प्रमाणे गावात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचत असल्याने मच्छरांचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे लहान मुला अबाल वृद्ध यांचे आरोग्य धोक्यात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. संपूर्ण गावात एकच हात पंप असुन गावातील ग्रामस्थ या हात पंपातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात, ज्या ठिकाणी डबके साचलेले राहते. साचलेल्या डबक्यातील
घाण पाणी जमिनी मधून झिरपत असल्याने हातपंपाचे पाणी दुषित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे मागील अलीकडच्या कालावधीत संबंधित आरोग्य विभागा कडून गावात केलेल्या सर्वेक्षणात किडनी ग्रस्थ रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे नागरीका मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सध्याची परीस्थित गावातील जल जीवन मिशन अंतर्गत ची कामे अपूर्ण अवस्थेत असून जल जीवन मिशन अंतर्गत नागरिकांना भरपूर व शुद्ध पाणी मिळण्याच्या उद्देशाने बांधकाम करण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम रखडलेल्या अवस्थेत असून बांधकाम करणे बाबत काहीच हालचाली दिसून येत नाही. संबंधित ग्राम पंचायत चिंचोली गणु यांना गावात सुविधा उपलब्ध करणे संदर्भात निर्माण होत असलेल्या समस्या सोडविण्या बाबत वेळोवेळी मागणी करण्यात आली, परंतु गावकऱ्यांनी केलेल्या मागण्या कडे संबंधित प्रशासनाचा केवळ दुर्लक्षीत पणा असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आपण बल्हाडी या गावातील विविध गंभीर समस्येकडे लक्ष देऊन बल्हाडी गाव वासियांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी अजय बाबर,लखन चव्हाण,सुनील माळवे,रतन चव्हाण,पंजाब शिंदे,भगत शिंदे आदी कडून करण्यात आली आहे…

Previous articleजन्म व मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांची परवड बाहेरगावी मजुरीसाठी गेलेल्या नागरिकांना वारंवार फेऱ्या मारूनही मिळत नाहीत दाखले