15 फेब्रुवारी पर्यंत होणार सक्तवसुली.
ग्रामीण पत्रकार संदिप देवचे 9860426674
पहुरजिरा:राजामाता जिजाऊ यांच्या जयंती व युवा दिनाच्या निमित्त पहूरजिरा येथे सामाजिक कार्यकर्ते सुरेश चिम यांनी आमरण उपोषण सुरु केले होते, अवघ्या एकाच दिवसात तब्बल 537 गावकरी यांनी उपोषणाला भेट देऊन उपोषणाला पाठिंबा देऊन आंदोलन चांगलेच उचलून धरले होते. 67 लाखांच्या भ्रष्टाचाराच्या सक्त वसुली साठी त्यांनी ग्रामपंचायत कार्यलया समोर उपोषण सुरु केले त्या संदर्भात आज दिनांक 13/1/26 रोजी BDO साहेबांच्या मध्यस्तीने उपोषणाची सांगता करण्यात आली, शिष्टमंडलाने 15 फेब्रुवारी पर्यंत आम्ही सक्त वसुली करू अशे आश्वासन दिल्यामुळे सर्व गावकर्यांनी आज उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. 15 फेब्रुवारी पर्यंत सक्त वसुली न झाल्यास पुढील उपोषण हे शेगाव येथील BDO कार्यलय समोर करण्यात येईल अशी विनंती वजा मागणी सुरेश चिम यांनी दिली. त्यांनी केलेल्या उपोषणाला माजी आमदार दिलीप कुमार जी सानंदा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा यांनी पाठिंबा दिला. उपोषणाच्या यशा बद्दल गावकर्यांनी सुरेश चिम यांचे अभिनंदन केले.



