“आता आजार नको, आरोग्य हवे ” – जन-जनाचा निर्धार,
भुमीराजा न्युज / प्रतिनिधी संतोष मोरे
बाळापूर : नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर बाळापूर मध्ये एक ऐतिहासिक व लोककल्याणकारी उपक्रम सुरू होत आहे. जीवनशैलीमुळे उद्भवणारे आजार, वाढते लठ्ठपण आणि असंतुलित आहारामुळे त्रस्त नागरिकांसाठी हा उपक्रम आशा, आरोग्य आणि जागृतीचा नवा संदेश घेऊन आला आहे.
“आरोग्यम सी : समग्र जीवनाकडे तुमचा मार्ग”
हा केवळ आरोग्य शिबिर नसून, निरोगी व जागरूक समाजनिर्मितीच्या दिशेने उचललेले एक प्रभावी जनआंदोलन आहे. या विशेष उपक्रमांतर्गत नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, वैज्ञानिक व्यायाम मार्गदर्शन तसेच वैयक्तिक आहार सल्ला दिला जाणार आहे.
आयोजकांचा स्पष्ट संदेश आहे हे केवळ फिटनेसपुरते मर्यादित नाही, तर संतुलित, ऊर्जावान आणि आत्मविश्वासपूर्ण जीवनाकडे टाकलेले पाऊल आहे.”
या शिबिरात गरजेनुसार वजन कमी करण्यासाठी तसेच वजन वाढवण्यासाठी १००% टक्के वैज्ञानिक आहार मार्गदर्शन दिले जाणार असून, ही बाब बाळापूरसाठी नवी दिशा व नवा विचार दर्शविणारी आहे.
*या आरोग्य क्रांतीस प्रत्यक्षात आणण्यासाठी मौलाना शमशाद आलम यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील जागरूक नागरिक – जुबेर अहमद, यासिर अहमद, शाकिर अहमद, जावेद इक्बाल–गुलजार, डॉ. शारीक खान, आसिफ शाह (DSSB ग्रुप), रिजवान कुरैशी, मोहम्मद काशिफ (फिटनेस) यांच्यासह अनेक समाजसेवकांचे मोलाचे योगदान लाभले आहे.या कार्यक्रमासाठी पुण्याहून आलेले अनुभवी आरोग्य तज्ज्ञ – प्रांजल धमाले (महिला आरोग्य व आहारतज्ज्ञ), अविनाश शेल्के व गौतम इंगळे (आरोग्य व फिटनेस कोच) आपल्या सेवा देणार आहेत. जिल्हा परिषद शाळा मैदानाजवळ, बाळापूर
आयोजकांनी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, या मोफत आरोग्य अभियानात सहभागी होऊन निरोगी बाळापूरच्या उभारणीत आपले योगदान द्यावे.
आज संपूर्ण बाळापूर एकाच आवाजात म्हणत आहे -“आता आजार नको, आरोग्य हवे!”



