Home Breaking News मैत्री करून युवती सोबत काढले अर्धनग्न फोटो, युवतीचे फेक अकाउंट इंस्टाग्राम वर...

मैत्री करून युवती सोबत काढले अर्धनग्न फोटो, युवतीचे फेक अकाउंट इंस्टाग्राम वर बनवून वायरल करायची देत होता धमकी; गुन्हा दाखल

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी          खामगाव- मैत्री करून युवतीसोबत सेल्फी घेतली. त्या सेल्फीवरून ब्लॅकमेल करत लॉजवर नेऊन युवतीचे अर्धन फोटो काढले व सदर युवतीचे लग्न ठरले असता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी केली. एखाद्या क्राईम स्टोरी सारखी घटना हिंगणा उमरा येथे उघडकीस आली असून याप्रकरणी युवकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील हिंगणा उमरा येथील २१ वर्षीय युवती सोबत वैभव कैलाससिंग पवार (२५) रा. संभापूर याने मैत्री केली. मैत्रीचा फायदा घेऊन त्याने तिच्या सोबत सेल्फी घेतली. सदर युवतीने हा फोटो डिलीट करण्यास सांगितले असता त्याने सदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन या युवतीला शेगाव येथील लॉजवर नेले. तेथे तिचे कपडे काढून फोटो घेतले. त्यानंतर वैभवने तिच्या घरी जाऊन पुन्हा तिचे अर्धनग्न फोटो काढले. ही बाब सदर युवतीने घरी आई- वडिलांना सांगितली. त्यावरून तिच्या कुटुंबियांनी व भवला समजावून सांगत फोटो डिलीट करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने होकार दिला होता. मात्र सदर युवतीचे लग्न ठरले असता वैभवने त्या युवतीच्या नावाने इंस्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करून तिचे अर्धनग्न आक्षेपार्ह फोटो व्हायरल करून तिची बदनामी केली. याबाबत पीडित युवतीने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून पोलिसांनी वैभव कैलाससिंग पवार याच्याविरुद्ध कलम ३५४ अ ५००, ५०६,२९२. २९२ (२) अ. भादंवी सहकलम ६६ ई. ६७,६७ अ, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleखाजगी विनाअनुदानित अनुदानित शाळा,तुकडीवर बदली स्थगिती विनाविलंब हटवा ;
Next articleमाता चिंदलदेवी देवस्थान येथे भाविकांना घेतला महाप्रसाद लाभ.