Home Breaking News लॉयन्स क्लब संस्कृती खामगाव तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना हुडी जॅकेटचे वाटप.

लॉयन्स क्लब संस्कृती खामगाव तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना हुडी जॅकेटचे वाटप.

खामगाव:-(अजयसिंह राजपूत) लॉयन्स क्लब संस्कृती खामगावच्या वतीने एक वर्षासाठी दत्तक घेतलेल्या निवासी मूकबधिर विद्यालय, खामगाव येथे शिकणाऱ्या एकूण 140 विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी हुडी जॅकेट देण्यात आले.

लॉयन्स क्लब संस्कृती खामगाव शाळेच्या व मुलांच्या गरजेनुसार नियमितपणे सेवा पुरविते.
सर्व मुलांना त्यांच्या आकारानुसार जॅकेट्स देण्यात आले व त्यांचे वाटप करण्यात आले. या सेवेसाठी संस्कृती क्लबच्या सदस्यांनीच सहकार्य केले.
एमजेएफ लॉ उज्वल गोयंका, लॉ सुशील मंत्री यांनी जॅकेट प्रदान करण्यासाठी पूर्ण सहकार्य केले.
दत्तक सेवा प्रकल्प प्रमुख
लॉ सरिता अजय अग्रवाल, लॉ दिव्या अभय अग्रवाल, लॉ भारती उज्वल गोयंका आणि लॉ मुस्कान अजय छटवानी यांनी अथक परिश्रम घेतले.
यावेळी लॉयन्स क्लबचे अधिकारी, सदस्य व शाळेचे कर्मचारी व शिक्षक उपस्थित होते.
जॅकेट घातल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि आनंद शब्दात अवर्णनीय असल्याचे क्लबच्या सदस्यांनी सांगितले.
अशा आनंददायी भेटवस्तूंनी लॉयन्स क्लब संस्कृती खामगाव सदैव आपले सेवाकार्य चालू ठेवत समाजातील गरजूंना आपली सेवा देत राहील.

Previous articleभारतीय जनता पार्टी जुने नाशिक मंडळाच्या वतीने आयुष्यमान कार्ड वाटपाची जन आरोग्य मोहीम चालू
Next articleशेगावात मोफत भव्य हृदयरोग तपासणी शिबीर संपन्न