Home गुन्हेवृत्त आमिष दाखवून दिड लाखाचे दागिने लंपास; हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आमिष दाखवून दिड लाखाचे दागिने लंपास; हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अंगद सुरोशे हिमायतनगर/ प्रतिनीधी
हिमायतनगर, | शहरातील शंकर नगर भागातील एका नागरिकास तुम्हाला लॉटरीवर स्कुटी आणि सोने लागले आहे. असे आमिष दाखवून दिड लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना दि.०५ में रोजी भर दुपारी घडली आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिकात भीती निर्माण झाली आहे. शहरात भर दिवसा फसवणूक लुटमारीच्या घटना घडत असल्याने हिमायतनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्मान केले जात आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि, हिमायतनगर शहरातील शंकर नगर भागात मजुरदार विष्णू राजाराम उत्तरवार हे शहरासह ग्रामीण भागात उन्हातान्हात मुरमुरे विकून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह चालवितात. सकाळी १२ वाजेपर्यंत व्यवसाय करून आल्यानंतर घरी बसले असता कोणीतरी अज्ञात व्यक्ती अंगावर काळ्या रंगाचा पैंटशर्ट घालून असलेला आला. आणि तुम्हाला लॉटरीवर स्कुटी आणि सोन्याचे बक्षीस लागले असल्याचे आमिष दाखविले. त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडील सोने द्यावे लागेल असे म्हणून भुरळ पडून तुमच्याकडील सोने द्या सोनाराकडे वजन करून परत देतो अशी बतावणी केली.

यावर विश्वास बसत नसल्याने उत्तरवार यांनी मी माझ्या मुलास विचारून तुमच्याकडे सोने व मोबाईल देतो असे म्हंटल्यानंतर अज्ञात इसमाने तुम्ही चला मुलाला विचारू म्हणून सोबत सोने व मोबाईल घेण्यास सांगितले. आणि त्याअज्ञात व्यक्तीने त्याच्या स्प्लेंडर या दुचाकीवरून शहरातील रस्त्याने नेत असतानाच राज लाईट्स या दुकानाच्या बाजूला गाडी थांबवून गाडीवरून उतरविले. आणि त्यांच्या जवळ खिशात असलेला सोने-मोबाईल घेऊन सोनाराकडे जाऊन याची पावती आणतो म्हणून दिशाभूल करून १६.५ ग्रॅम वजन असलेले ८९ हजाराचे गंठण आणि १० ग्रॅम वजन असलेले ५४ हजार किमतीचे एड व १३ हजार ९९९ रुपयाचा मोबाईल असा एकूण १ लक्ष ५६ हजार ९९९ रुपयाचा ऐवज घेऊन पोबारा केला.

याबाबतची फिर्याद विष्णू राजाराम उत्तरवार यांनी दिल्यावरून हिमायतनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर ४२० म्हणजे फसवणूक करून दागिने लंपास केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपस पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली बिट जमादार बालाजी सिंगणवाड हे करीत आहेत. दरम्यान आरोपी ज्या दिशेने दुचाकीवरून पळाला त्या भागाचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून, पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. दिवसा ढवळ्या नागरिकांची अश्या प्रकारे फसवणूक करून एक प्रकारे सोण्याचे दागिने लंपास झाले आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून, पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास लावून पुन्हा शहरात अश्या प्रकारच्या घटना घडणार नाहीत यासाठी कठोर पाऊले उचलावीत अशी मागणी नागरीकातून केली जात आहे.

याबाबत फिर्यादीकडून माहिती घेतली असता अज्ञात आरोपीने आमच्या घरी येऊन लॉटरी लागल्याचे सांगून जबरीने सोने आणि मोबाईल घेऊन पळ काढला असल्याचे सांगितले आहे. त्या दुचाकी स्वाराचा पाठलाग केला असता त्याने जोरात दुचाकी दामटून पळ काढला, याची माहिती मी मुल्ला दिली असता त्यांनी शहरातील मुख्य ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून त्या चोरट्याचे छायाचित्र पोलिसांना देऊन तपास लावून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous articleकरंजी ता.हिमायतनगर येथील अल्प भूधारक शेतकरी चाभरेकर दांपत्यांनी साकारले शेतीत नंदनवन….
Next articleनिधन वार्ता