Home समाजकारण शेगावात मोफत भव्य हृदयरोग तपासणी शिबीर संपन्न

शेगावात मोफत भव्य हृदयरोग तपासणी शिबीर संपन्न

शितल शेगोकार शेगाव : (प्रतिनिधी) अल्पसंख्यांक हक्क दिवस निमित्ताने शनिवारी डॉ असलम खान यांच्या शिफा किल्नीक शेगाव व गोदावरी फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य हृदयरोग आरोग्य तपासणी शिबीर चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रूग्णांनाची मोफत रक्तदाब तपासणी (बि पि). ब्लड शुगर. कार्डीओगीराम (ई.सि.जी) आणि २ डी ईको करण्यात आले आहे.
शिबिरात डॉ. स्वप्नील सांबपुरे डी.एम कार्डीओलाजीस्ट व डॉ. दिनेश चौधरी एम डी मेडिसिन यांनी सर्व रूग्णांनाची तपासणी केली आहे. शिबिरात डाॅक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे १५ रुग्णांना अँजिओग्राफी साठी सांगितले आहे. बाकी रूग्णांना औषधोपचार करण्यात आले आहे. १५ रूग्णांनाची अँजिओग्राफी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात व रूग्णालय जलगांव खान्देश येथे मोफत करण्यात येणार आहे. त्या १५ रूग्णांना जाने येण्या साठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जलगांव खान्देश यांची गाडी येत्या मंगलवारी २६ डिसेंबर ला सकाळी १० वाजता शिफा किल्नीक शहिद अ.हमीद चौक आठवाडी बाजार शेगांव येथे रूग्णांना घेण्या साठी येत आहे . रूग्णांनी सोबत ओरीजिनल रेशन कार्ड व आधार कार्ड सोबत घेऊन जावे. असे आव्हान आयोजक डॉ. असलम खान उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग तथा संस्थापक अध्यक्ष फारूक ऐ आजम अल्पसंख्यांक बहुउद्देशीय संस्था शेगांव यांनी केले आहे.

अँजिओग्राफी झाल्या नंतर जे रूग्णांना अँजिओप्लास्टी ची गरज असतील असे रूग्णांनाची अँजिओप्लास्टी सुध्दा मोफत करण्यात येतील. या शिबिरात डॉ स्वप्नील सांबपुरे डॉ दिनेश चौधरी रत्नशेखर जैन सर. डिपंल पाटील मॅडम. विजय राजपुत. तेजस्वी बाभळे. ऐश्वर्या काटकर व डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जलगांव खान्देश यांच्या पुर्ण टिम ने सेवा दिली आहे. शिबीर यशस्वी करण्यासाठी शिफा किल्नीक. रिलीफ मेडिकल अॅन्ड जनरल स्टोअर्स शिफा किल्नीक शहिद अ.हमीद चौक आठवाडी बाजार शेगांव. अदनान खान. शरीफ अहेमद. अफरोज खान.मो. फजलुर रेहमान. सै. असलम वकार अहेमद. शोयब अहेमद. शाहिद अहेमद व फारूक ऐ आजम अल्पसंख्यांक बहुउद्देशीय संस्था शेगांव यांच्या सहकाऱ्यांनी परीश्रम घेतले. संचालन व आभारप्रदर्शन अदनान खान यांनी केले.

Previous articleलॉयन्स क्लब संस्कृती खामगाव तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना हुडी जॅकेटचे वाटप.
Next articleखासदार हेमंत पाटील यांचा युवकांना वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून दिल्ली अभ्यासदौरा एक नाविन्यपूर्ण उपक्रम : बाबुराव कदम कोहळीकर