Home Breaking News खासदार हेमंत पाटील यांचा युवकांना वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून दिल्ली अभ्यासदौरा एक नाविन्यपूर्ण...

खासदार हेमंत पाटील यांचा युवकांना वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून दिल्ली अभ्यासदौरा एक नाविन्यपूर्ण उपक्रम : बाबुराव कदम कोहळीकर

विवेकानंद माध्यमिक विद्यालयात वक्तृत्वस्पर्धा संपन्न

हिमायतनगर -प्रतिनीधी

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी शिक्षण, आरोग्य, शेती, सिंचन, सहकार अशा महत्त्वपूर्ण विषयाला प्राधान्य देत विकासाला चालना देण्याचे काम करत असतांना त्यांनी युवकांमधील गुण कौशल्य पुढे यावेत या उद्देशाने मागील वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी विधानसभा स्तरावर भव्य निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले. या स्पर्धेच्या माध्यमातून निवडणुकीचे गणित न मांडता विद्यार्थ्याभिमुख उपक्रम राबविण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. दिल्ली अभ्यासदौरा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे असे वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी येथे केले.

हदगाव येथील विवेकानंद माध्यमिक विद्यालयात गुरूवारी (दि. २१) खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हदगाव – हिमायतनगर विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी कयाधू-पैनगंगा महोत्सव समिती अंतर्गत हिंदुहृदयसम्राट स्व. श्री.बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.

या प्रसंगी गोदावरी अर्बन समुहाच्या अध्यक्ष राजश्रीताई हेमंत पाटील, विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बंडोजी भोसले, हदगाव शिवसेना तालुकाप्रमुख विवेक देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाराव लांडगे, माजी सभापती विजय वळसे पाटील, माजी सभापती बाबुसराव रुईकर, विभाग प्रमूख मारोतराव हरडफकर, युवा सेना जिल्हाप्रमुख संदेश पाटिल हडसनीकर, सरपंच संघटना तालुका सचिव रुपेश पाटील तंत्रे, महिला जिल्हाप्रमुख शितल भांगे, दुर्गाताई भारती, आशा गव्हाणकर, वर्षा कदम, कविता शिंदे, विशाखा खंदारे, भास्कर पाटील, गजानन गोपेवाड, ज्ञानेश्वर पुट्ठेवाड, नागोराव गुडकर याची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना श्री कदम म्हणाले की, खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड दक्षिणचे आमदार असतांना देखील आषाढी महोत्सव च्या निमित्ताने सलग पंधरा वर्षे आषाढी महोत्सवाचे आयोजन केले होते, यामध्ये एका पेक्षा एक दर्जेदार गायक कलाकार यांना आमंत्रित करून रसिक स्रोत्यांना संगीत ऐकण्याची मेजवानी दिली आहे. जिल्हा परिषदेत शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘मी अनवाणी’ सारखा कार्यक्रमाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. गोदावरी अर्बन सारख्या संस्थेच्या माध्यमातून आज अडीच हजार कुटुंबांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. पैनगंगेवर बंधारे बांधले जावेत यासाठी मागील 30 वर्षापासून मागणी केली जात होती पण कुणीही ती मागणी पूर्ण करू शकले नाही खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याशी थेट संपर्क साधून हा प्रकल्प मार्गी लावला आहे. या प्रकल्पामुळे पैनगंगेच्या तीरावर असलेली एक लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. ही या मतदार संघातील सर्वात मोठी उपलब्धी असल्याचे श्री कदम म्हणाले.

यावेळी गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील बोलतांना म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला त्यामुळे त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले परंतु स्पर्धेच्या माध्यमातून पुढे आल पाहिजे या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी मागील वर्षापासून सुरू केलेला निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा रद्द केल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बंडोजी भोसले यांनी अध्यक्षीय समारोप केला.

या स्पर्धेत अर्जुन सोनवणे प्रथम, तन्वी शिंदे व्दितीय, तेजश शिंदे तृतीय, महेश काळे उत्तेजणार्थ – १, पुजा हरणपाटील उत्तेजणार्थ -२ हे स्पर्धक विजेते ठरले, स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून महेश अचिंतलवार, अमीर सोहेल, गोविंद अंभोरे यांनी परिक्षण केले, आशिष साडेगावकर यांनी सुत्रसंचालन केले, स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अकाश डांगे निवळेकर, गोविंद गोडसेलवार, मारोती जाधव, आकाश शिंदे यांनी परिश्रम घेतले.

Previous articleशेगावात मोफत भव्य हृदयरोग तपासणी शिबीर संपन्न
Next articleमहात्मा ज्योतिबा फुले मा. व उच्च माध्य. विद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न.