Home Breaking News माता चिंदलदेवी देवस्थान येथे भाविकांना घेतला महाप्रसाद लाभ.

माता चिंदलदेवी देवस्थान येथे भाविकांना घेतला महाप्रसाद लाभ.

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 05 डिसेंबर 2022

नाशिक- निर्मल महामार्गावरील हिमायतनगर ते सवना रोडवर असलेल्या माता चिंदलदेवी देवस्थान तर्फे आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ तेलंगण राज्यसहित, मराठवाडा, विदर्भ आदी भागातील भाविकांनी घेतला आहे. नवसाला पावणारी माता चिंदलदेवी येथे शेकडो वर्षांपासून एक लिंबाचे झाड आजही अस्तित्वात आहे. त्या झाडाला बाईलेकीने एकतरी कापडी पीस ( कापडाचा 1 मीटर तुकडा) बांधुन आपल्या सुखी संसाराची गोडी लाभावी. अशी प्रथा आहे. म्हणूनच छायाचित्रात दिसत असलेल्या कापडी पिस एक आगळावेगळा नजारा त्या लिंबाच्या झाडांला दिसत आहे.
गेल्या चार वर्षांपुर्वी या चिंदलदेवी देवस्थान उद्धार व्हावा म्हणून, अनेकांनी श्रद्धांपुर्वक मंदिर बांधण्याचा चंग बांधला. तो चार वर्षांपूर्वी पुर्णत्वास गेला आहे. देवींच्या मूर्ती स्थापनेसह पुर्णत्वास पुजारी माय आणि भाविकांनी पुर्ण केला आहे.
आईच्या सेवेसाठी आई ( माय) सतत गेल्या चार वर्षांपासून चिंदलदेवीचा हा उत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडत आहेत. या भागातील भाविकभक्त मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.
या भागातील लोकप्रतिनिधींनी या चिंदलदेवी देवस्थानचा उद्धार करण्यासाठी सढळ हस्ते मदत करावी. अशी मागणी या मंदिराच्या पुजारी आई ( माय) आणि भाविक भक्त यांनी केली आहे.

Previous articleमैत्री करून युवती सोबत काढले अर्धनग्न फोटो, युवतीचे फेक अकाउंट इंस्टाग्राम वर बनवून वायरल करायची देत होता धमकी; गुन्हा दाखल
Next articleशेतकरी आत्महत्या रोखण्यात शासन; करते अपयशी