Home Breaking News दोन महीन्या पासून देगांव येथील बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध लागेल का?

दोन महीन्या पासून देगांव येथील बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध लागेल का?

आई वडीलांचा टाहो

शेख चाँद जिल्हा प्रतिनिधी 

पोलीस स्टेशन बाळापुरात तक्रार दाखल
पोलीस तपास होत नसल्याची मुलीच्या वडीलांची वरीष्ठा कडे लेखी तक्रार

बाळापूर :- देगांव अल्पवयीन मुलगी दिनांक 11/2/23 पासून बेपत्ता झाली की कोणी पळून नेले . आज रोजी दोन महिन्या पासून येथील रहिवासी सुभाष कोगदे यांची मुलगी बेपत्ता असून अजून पर्यंत तिचा पत्ता लागला नाही . तिचा सर्वत्र शोध घेतला असता पत्ता लागला नाही. करीता दिनांक 13/2/23 रोजी बाळापूर पोलीस स्टेशनला मुलगी बेपत्ता अल्याबाबत तक्रार दाखल करन्यात आली असून त्याचा क्र. 7/2023 नोंदविण्यात आला. त्यानंतर सतत आम्ही मुलीचा। शोध घेतला परंतू आम्हाला असे समजले की गावातीलच पवण मुरलीधर जुमळे वय अंदाजे 23 वर्षे याने माझ्या मुलीला पळून नेले. करीता दिनांक 19/2/23 रोजी याचे विरुद्ध बाळापूर पोलीस स्टेशन ला तक्रार केली असून भा.दंड स. कलम 363 नूसार गुन्ह्याची नोद करन्यात आली असून अजून ही मुलीचा पत्ता लागला नाही. करीता वरिष्ठां कडे तक्रार करन्यात आली. माझी मुलगी शोधा अन्यथा आम्ही परिवारास सह आत्मदहन करू असे या लेखि तक्रार मध्ये नमूद आहे. वरिष्ट या कडे लक्ष देनार का ?

Previous articleशिक्षक सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करा
Next articleभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी!