Home Breaking News भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी!

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 14 एप्रिल 2023

हिमायतनगर तालुक्यात विविध शासकीय कार्यालयात, बौद्ध विहारात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली.
तालुका कृषी कार्यालय, पंचायत समिती, तहसिल कार्यालय, भुमी अभिलेख, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय दवाखाना आदी शासकीय कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर सवना ज. येथील बौद्ध विहार आणि ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी वाठोरेसर भिमगित गाऊन मनोगत व्यक्त केले. सवना ज. नगरीचे सरपंच परमेश्वर गोपतवाड, पत्रकार मारोती अक्कलवाड पाटील यांनी यावेळी विचार मांडले आहेत. यावेळी सर्व समाज बांधव, नागरिक सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी, मुख्याध्यापक बोडावार मॅडम आदी उपस्थित होते. पंचशिल मित्र मंडळ सवना ज. यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने उत्तम नियोजन केले आहे.

Previous articleदोन महीन्या पासून देगांव येथील बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध लागेल का?
Next articleवाडेगांवात एका कुटूंबाचा दुसऱ्या कुटूंबावर तूफान दगडफेक