Home Breaking News शिक्षक सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करा

शिक्षक सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करा

मुख्याध्यापक शिक्षक संघाची शिक्षणा धिका-यांकडे मागणी

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी अद्य यावत करण्याची मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्या दालनात बैठक पार पडली त्यात त्यांच्या कडे केली आहे.
मुख्यध्यापक मान्यता देताना सहयाचे अधिकार न देता कायम स्वरुपी मान्यता द्यावी, सेवा जेष्ठता डावलली जाणार नाही याची खात्री करण्यात यावी. बऱ्याच अंशी सुपरवायझर, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक, यांना संस्थातर्गत वादामुळे प्रमोशन मिळत नाही. प्रत्येक संस्थेला पत्र पाठवून सेवाजेष्ठता यादी मागवून घ्यावी अशी मागणी करण्यात आली. डि. एड. ते बी. बी. एड. प्रमोशन फाइल निकाली काढावी, मूल्यांकन झालेल्या शाळा आणि टुकडया अनुदाना पासुन वंचित राहणार नाही याची काळज़ी घ्यावी. मेडिकल व रजा रोखीकरण बिले 100 टक्के मंजूर झाली आहेत, पण फरक बिला साठी जवळ पास 100 कोटी रूपयांन पर्यंत अनुदानाची गरज आहे. त्याचा कार्यलया कडून पाठ पुरावा करावा. शाळाना वेतन अनुदान अदा करण्यासाठी विद्यार्थीचे आधार प्रमाणित करणे अनिवार्य आहे. त्या तांत्रिक अडचणी शासनाला कळवाव्यात. नाशिकच्या नामांकित संस्थेत संस्था वादामुळे बऱ्याच शिक्षकांच्या मान्यता प्रलंबित आहेत. हा प्रश्न शासनाकडे पाठवून मार्गी लावावा या मागण्या शिक्षणाधिका-या कडे केल्या.
या बैठकी मध्ये मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, सचिव एस. बी. देशमुख, उपाध्यक्ष प्रदीप सांगळे, परवेजा शेख, रामनाथ लोंढे, राजेंद्र निकम, के. डी, देवढे, विनायक पाटील, बी. व्ही. पांडे. अनिल माळी, किशोर पालखेडकर आदी सहभागी होते.

Previous articleक्रांतीसुर्य ज्योतिराव फुले यांची जयंतीची साजरी मोठ्या उत्साहात मिरवनूक*
Next articleदोन महीन्या पासून देगांव येथील बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध लागेल का?