Home Breaking News हदगाव शिवसेने कडून तहसील कार्यालयावर मोर्च्या ; व तहसीलदारांना निवेदन!

हदगाव शिवसेने कडून तहसील कार्यालयावर मोर्च्या ; व तहसीलदारांना निवेदन!

नांदेड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा तात्काळ आर्थिक मदत द्यवी- नागेश पाटील आष्टीकर

हदगाव तालुका प्रतिनिधी, रविकुमार पवार
मो- ७३५०३३३४१५

हदगाव प्रतिनिधी /-
गेल्या तीन आठवड्यापासून हदगाव-हिमायतनगर तालुक्यात सतत धार पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याने आज माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर व तालुक्यातील सर्व शिवसैनिक तहसीलदार जीवराज डापकर यांना मोर्च्या काढून ओला दुष्काळ जाहीर करा या बाबतचे निवेदन देण्यात आले आज माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस सुमन गार्डन मध्ये साजरा करण्यात आला तालुक्यातील अनेक शिवसैनिकानी हजेरी लावली होती यावेळी तालुका अध्यक्ष श्यामराव चव्हाण. डॉ. संजय पवार.जाकेर चाऊस गजानन शिंदे.बंडू पाटील तालगकर. राजू पाटील हडसनीकर विशाल शिंदे अरविंद जाधव बालाजी सूर्यवंशी. सतीश मोरे.साईनाथ सूर्यवंशी शेतकरी व शिवसैनिक बांधव उपस्थित होते ,मागील दोन आठवड्यापासून अति मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. आता पर्यंत झालेल्या पावसाचे प्रमाण पाहता दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणी करिता तहसीलदार कार्यालय बुधवार दुपारी 12:30 सुमन मंगल कार्यालय, हदगाव ते तहसील कार्यालय हदगाव पर्यंत मोर्चा सह निवेदन देण्यात आले आहे

Previous articleटेंभी येथील अवैधरित्या दारू विक्री व नागपंचमी निमित्त खेळले जाणाऱ्या गंजीपत्याचे डाव बंद करण्यासाठी पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन!
Next articleआतिवृष्ठी चे संकट असतांनाच धुवारीचे आगमन….